Baramati Bypoll News : बारामतीच्या रिंगणात नवा ट्विस्ट! सुनेत्रा पवारांविरोधात राष्ट्रवादीच्या आमदाराची पत्नी उमेदवार

Political twist in Baramati election Maharashtra: बारामती पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट! सुनेत्रा पवारांविरोधात या महिला उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. सविस्तर बातमी आणि राजकीय घडामोडी जाणून घ्या.
Sunetra Pawar election Baramati political updates
Sunetra Pawar election Baramati political updatesSarkarnama
Published on
Updated on

Baramati constituency election: बारामतीच्या राजकीय मैदानात यंदा अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 6 एप्रिल 2026 रोजी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते.

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून, सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, चित्र अचानक बदलले. काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी देत थेट लढतीची घोषणा केली.

Sunetra Pawar election Baramati political updates
8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! 8 व्या वेतन आयोगाबाबत 'या' तारखेला होणार मोठा निर्णय; पाहा किती वाढणार पगार?

त्यामुळे बारामतीत आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सरळ सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी विरोधकांनी उमेदवार न उभा करता निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती केली होती, पण काँग्रेसने ती मान्य केली नाही.

दरम्यान, या निवडणुकीत एकूण 55 उमेदवारांनी 68 अर्ज दाखल केले होते. 7 एप्रिल 2026 रोजी झालेल्या छाननीत 53 अर्ज वैध ठरले, तर 15 अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले. यामध्ये 13 अर्ज हे दुहेरी असल्याने रद्द करण्यात आले, तर 2 अर्ज तांत्रिक चुका असल्यामुळे बाद झाले. या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नेमके किती उमेदवार मैदानात राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baramati election 2026
Baramati election 2026Sarkarnama

या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चा एका अपक्ष उमेदवारामुळे रंगली आहे. करुणा धनंजय मुंडे यांनीही या निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यांनी स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे बारामतीतील ही निवडणूक आता अधिकच रंगतदार आणि चर्चेचा विषय ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com