Sharad Pawar Group News : बालेकिल्ल्याच्या पुनर्बांधणीची जबाबदारी शरद पवारांनी सोपवली मुरब्बी नेत्याच्या मुलाकडे

Baramati NCP : ॲड. राजेंद्र काटे देशमुख यांना पुणे जिल्हा उपाध्यक्ष, तर प्रशांत बोरकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहर युवक अध्यक्षपद सोपविण्यात आलेले आहे.
Adv. Sandeep Gujar
Adv. Sandeep GujarSarkarnama

Baramati : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा पक्षबांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यातूनच बालेकिल्ला मानल्या गेलेल्या बारामती शहराध्यक्षपदाची जबाबदारी मुरब्बी नेत्याच्या मुलाकडे सोपवली आहे. (Baramati City President of NCP (Sharad Pawar Group) Selection of Sandeep Gujar)

बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातले आहे. एकीकडे मतदारसंघात संपर्क साधताना त्यांनी पक्षबांधणीही होईल, याची दक्षता घेतल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वीच ॲड. एस. एन जगताप यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बारामती तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Adv. Sandeep Gujar
Chandrachud's Big Statement : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मोठे विधान; ‘सुप्रीम कोर्टाचा निर्णय विधिमंडळाला नाकारता येत नाही’

बारामती शहराध्यक्षपदाची जबाबदारी माजी नगराध्यक्ष विनोदकुमार गुजर यांचे चिरंजीव ॲड. संदीप गुजर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते शरद पवार गटाची मजबूत बांधणी कशी करतील, याकडे बारामतीकरांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, ॲड. राजेंद्र काटे देशमुख यांना पुणे जिल्हा उपाध्यक्ष करण्यात आले आहे, तर प्रशांत बोरकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहर युवक अध्यक्षपद सोपविण्यात आलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन बारामती शहरात मजबूत करणे. बूथ कमिट्या स्थापन करून प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांच्या निवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे ॲड. संदीप गुजर यांनी निवडीनंतर सांगितले.

अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजप सरकारसोबत जाऊन उपमुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासोबत राज्यातील बहुतांश आमदार गेल्याने पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी नव्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया शरद पवार गटाने वेगाने हाती घेतली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तातडीने पावले टाकत नव्या तरुण लोकांवर पक्षवाढीची धुरा सोपवली आहे.

Adv. Sandeep Gujar
Manoj Jarange Patil News : ‘चेहऱ्यावर हसू येतं, तेव्हा वाटतं आता बरं वाटतंय; पण पुन्हा तब्येत बिघडते...’

भाजपसोबत जाण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला. मात्र, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. त्यामुळे राज्याप्रमाणेच बारामतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. मात्र, बारामतीतील बहुतांश जुने पदाधिकारी हे अजित पवार गटासोबत गेल्याचे चित्र आहे.

आगामी निवडणुकांमध्ये हे दोन्ही गट सक्रिय दिसण्याची शक्यता आहे. त्यातून आपापल्या गटाचे बळ वाढविण्यासाठी येणाऱ्या काळात दोन्ही गटांकडून प्रयत्न होताना दिसतील. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शरद पवार गटाने सहभाग घेतलेला नाही. मात्र, इतर निवडणुकांत तो दिसण्याची शक्यता आहे.

Adv. Sandeep Gujar
Gram Panchayat Election : ‘गावची ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले; पण...’ : मतदानानंतर शहाजीबापूंनी व्यक्त केली खंत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com