Pune News : 'मविआ' सोबत 'वंचित' ची युती झाल्यास राष्ट्रवादीला बारामतीत फायदा होणार ?

Baramati Lok Sabha Constituency News : प्रकाश आंबेडकर यांची आज कोल्हेवाडी परिसरात जाहीर सभा होत आहे.
Supriya Sule, Prakash Ambedkar
Supriya Sule, Prakash Ambedkarsarkarnama

Baramati Lok Sabha Constituency : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे, पण महाविकास आघाडीने 'वंचित'शी अद्याप युती केलेली नाही, आघाडीने 'वंचित'शी युती केल्यास नवी राजकीय समीकरण काय होतील, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

शिवसेनेशी युती झाल्यानंतर वंचित विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची आज (सोमवारी) खडकवासला मतदार संघातील कोल्हेवाडी परिसरात जाहीर सभा होत आहे.

आंबेडकरांच्या स्वागतासाठी 'वंचित' आणि ठाकरे गटाने तयारी केली आहे. या सभेला शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित विकास आघाडी मध्ये सध्या बिनसलेले आहे. आगामी काळात मविआ मध्ये वंचित येणार का, यावर सध्या तरी प्रश्न चिन्ह आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सोबत वंचित बहुजन विकास आघाडी आल्यास बारामती लोकसभा मतदार संघात तरी त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होताना दिसेल, अशी चर्चा आहे, कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसला शिवसेना आणि वंचितची अशा दोन पक्षांची मते जास्त मिळणार आहेत.

Supriya Sule, Prakash Ambedkar
Narendra Modi: मोदींची वादग्रस्त डॉक्युमेंट्री, 10 विद्यार्थी निलंबित ; अधिवेशनात हा मुद्दा गाजणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २०१९ मध्ये खडकवासला व दौंड मधील उमेदवार फार कमी फरकाने पराभूत झाले होते. बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपचे वाढणारे मतदान रोखणे राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आव्हान आहे. ते रोखण्यासाठी भाजप विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे.

लोकसभेला २०१४ मध्ये खासदार सुप्रिया सुळे या महादेव जानकर यांच्या विरोधात ६९ हजार ७१९ मतांनी विजय झाल्या होत्या. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना ६ लाख ८६ हजार ७१४ मते मिळाली होती.

कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार ९४० मते मिळाली होती. तर वंचितचे नवनाथ पडळकर यांनी ४४ हजार १३४ मते घेतली होती. नवनाथ पडळकर यांची ४४ हजार मते पडली. ती राष्ट्रवादी कॉंग्रेसची कमी झाल्याचे राजकीय विश्लेषण सांगतात.

Supriya Sule, Prakash Ambedkar
Naba Das : आरोग्यमंत्र्यांवर त्याने का झाडल्या गोळ्या ? ; हत्येपूर्वी मुलीला केला होता Video Call..

सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत फुट पडली. खडकवासला मतदार संघात शिवसेनेतून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात काही मोजकेच पदाधिकारी गेले आहेत. उर्वरित सर्व पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहेत. भाजप सोबत सध्या बाळासाहेबांची शिवसेना आहे.वंचित सोबत ठाकरे गटाची मते आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील.

निम्मी मते राष्ट्रवादीला मिळाली असती ..

आघाडीसोबत वंचित आल्यावर लोकसभा व विधानसभा या मतदार संघातील विचार करता येथील हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असतील. खडकवासला मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत तापकीर यांना एक लाख वीस हजार ५१८ मते मिळाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांना एक लाख १७ हजार ९२३ मते मिळाली होती. तिसर्‍या क्रमांकावर वंचित विकास आघाडीचे आप्पा आखाडे होते. त्यांनी पाच हजार ९३१ मते घेतली होती. आमदार तापकीर अवघ्या दोन हजार ५९५ मतांनी विजयी झाले होते. वंचितला मिळालेल्या पैकी निम्मी मते राष्ट्रवादीला मिळाली असती तर राष्ट्रवादीचे उमेदवार दोडके विजयी झाले असते.

दोन्ही पक्षाचे मतदान राष्ट्रवादीच्या पारड्यात..

शिवसेनेची आणि वंचित विकास आघाडीची आठ दिवसापूर्वीच युती झाली आहे. शिवसेनेला आणि वंचितला महापालिका निवडणुकीमध्ये जास्त फायदा होणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

महाराष्ट्र विकास आघाडी सोबत वंचितला सोबत घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तरी भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यावर बारामती लोकसभेत या युतीचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. कारण मागील वेळेस भाजप बरोबर असलेली शिवसेना आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात लढलेला वंचित असे दोन्ही पक्षाचे मतदान राष्ट्रवादीच्या मतदानात भर टाकेल. भविष्यात हि आघाडी झाल्यास आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होईल,असे सध्याचे तरी चित्र दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com