Baramati Lok Sabha: संधीच सोनं करायचं की राख? तुम्हीच ठरवा; अजित पवारांचं मतदारांना आवाहन

Ajit Pawar: "पाठीमागे आपल्या नेत्याने शिवसेनेबरोबर (Shivsena) जायला सांगितलं होतं, आपण गेलो. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळत होतं, भुजबळ साहेब, आर.आर पाटील किंवा माझ्या नशिबात असतं तर मी मुख्यमंत्री झालो असतो."
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Baramati Lok Sabha Election 2024: बारामती मतदारसंघातील (Baramati Constituency) लढतीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. ही राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे. कारण इथे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या मतदारसंघाची निवडणूक जवळ आल्यामुळे दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच आत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिरसुफळ येथे जोरदार भाषण करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तसेच विकासाची संधी सारखी सारखी येत नाही, त्यामुळे या संधीचं सोनं करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.

या सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पूर्वी मी बारामती तालुक्याला खूप वेळ देत होतो. मात्र आता माझ्यावर राज्याबरोबर देशाची देखील काही जबाबदारी आल्याने जास्त वेळ देऊ शकत नाही. मी गेली अनेक वर्ष तुमची काम करतोय तुम्ही मला सात वेळा निवडून दिलं आहे. अनेक संघटनांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. उद्याच्या सात तारखेला तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. या निवडणुकीत भावनिक मुद्दा केला जात आहे. शरद पवारांना माढा बारामतीने अनेक वेळा चांगले मतदान दिलं आहे. पवारांनी जसे मला सांगितले त्या पद्धतीने मी वागत आलो कुठेही कमी पडलो नाही, परंतु आता आता राजकीय चित्र बदललं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरसुफळ भागात आपल्या खासदाराने गेल्या दहा वर्षात एकही काम आणले असेल तर कोणीही हात वर करून सांगावं. राज्याचा निधी आपल्याला कमी पडतो म्हणून केंद्राचा निधी आणणे गरजेचे आहे. कृष्णा-नीरा-भीमा नदी जोड काम सुरू आहे . कृष्णा खोऱ्याचे पाणी निरा नदीत आणले आहे असून नीरा नदीतून ते भीमा नदीत उजनी धरणात सोडले जाणार आहे. आपण सरकारच्या बाहेर असतो तर काय केले असते फक्त आंदोलन मोर्चे काढले असते. पाठीमागे आपल्या नेत्याने शिवसेनेबरोबर (Shivsena) जायला सांगितलं होतं, आपण गेलो. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळत होतं, भुजबळ साहेब, आर.आर पाटील किंवा माझ्या नशिबात असतं तर मी मुख्यमंत्री झालो असतो, असा खुलासादेखील त्यांनी यावेळी केला.

मोदी (Narendra Modi) सरकारने निर्णय घेतला 31 रुपयाच्या खाली साखरेची विक्री करायची नाही. जर तो नियम नसता तर काय झालं असतं? हा शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही का? मी पण मोदींच्या विरोधात टीका करायचो. गाईच्या दुधाला आम्ही अनुदान दिलं, ज्यांना मिळालं नाही त्या शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळणार आहे. तर देशात 71 हजार कोटींची कर्जमाफी झाली, असे विरोधक सांगतात मात्र राज्याची किती झाली? मी असा दावा करणार नाही की, माझ्याकडून शंभर टक्के कामे झाली.

भावनिक होऊन मतदान करू नका

काही कार्यकर्ते माझ्याही सभेमध्ये येतात मला दिसतात आणि दुसर्‍या सभेला आले की त्यांच्याकडेही जातात. एकाचच कुंकू लावा, काम करतो तो चुकतो, मी बोलतो म्हणून चुकतो, चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या घरात आलेल्या सुनेला मतदान करायचं का मुलीला मतदान करायचं हे तुम्हीच ठरवा आज भावनिक होऊन मतदान करू नका. मी विकासासाठी तुम्हाला मत मागत आहे. मला सत्ता पाहिजे म्हणून मी मतं मागत नाही. मला बारामतीकरांनी भरभरून दिलं आहे मी समाधानी आहे. मी साठी ओलांडली आहे अजून दहा वर्षे काम करू शकतो, मी काम करणारा माणूस आहे, पहाटे पाचला उठतो आणि कामाला लागतो.

तुम्हाला सुवर्णसंधी आली आहे

राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांचा शब्द मोडला जात नाही. तसं देशाच्या राजकारणामध्ये पंतप्रधानांच्या शब्दाला मान आहे. तर आता तुम्हाला सुवर्णसंधी आली आहे. विकास कशातून होणार आहे तिकडे मतदान करा. समोरचे तुम्हाला पाणी देऊ शकतात का? राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे का? असा सवाल अजितदादांनी उपस्थित करत नागरिकांना युतीला मतदान करण्याचं आवाहन केलं. ते पुढे म्हणाले, आज विरोधकांना पंतप्रधानांवर टीका करायला जागा नाही, कारण पंतप्रधानांनी तेवढे काम केलंय, विकास केला आहे. आम्ही एकमेकांचे कट्टर विरोधक देशाच्या भल्यासाठी एकत्र आलो आहोत. सारखी सारखी कोणाला संधी येत नाही आता तुम्हाला चांगली संधी आली आहे त्या संधीच सोन करायचं की राख करायचं हे तुम्ही तुमच्या मताच्या रुपात ठरवा.

Ajit Pawar
Sanjay Raut News : संजय राऊतांनी धरले धारेवर; जिंकण्याची खात्री आहे तर फडणवीस, अजित पवार धमक्या का देत आहेत?

मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतो

यावेळी ते म्हणाले, सभेत बसलेल्या एकाही माणसाने सांगावे की दहा वर्षात मोदी साहेबांवर एक भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. राजीव गांधींच्या काळात भ्रष्टाचार झाला तसा मोदींच्या काळात झाला का ते तुम्ही सांगा असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत मोदींचे कौतुक केलं. भाषण ऐकले की विरोधक म्हणतात बघा अजित पवार दम द्यायला लागले. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतो. मी कधी जात बघून काम करत नाही. मोदी सरकारने 10 लाखांचे मुद्रा लोन 20 लाख केले. आरक्षणाच्या बाबतीत टिकणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय आता तुम्हाला कुणी काहीही सांगेल, आम्ही हे करेन ते करेन पण त्यांचा काळ असाताना त्यांनी काय केले? ते तुम्ही पाहिलं आहे, असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंवर नाव न घेता टीका केली.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com