Supriya Sule : बारामती पाहण्यासाठी मी त्यांना स्वतः घेऊन जाईन ; सुळेंचा भाजप नेत्यांना चिमटा

Supriya Sule : बारामती पाहण्यासारखी आहे. नरेंद्र भाई मोदी, अमित शहा आणि महत्त्वाचे नेते सगळे बारामतीत आले आहेत.
 ram shinde, Nirmala Sitharaman, supriya sule
ram shinde, Nirmala Sitharaman, supriya sulesarkarnama

पुणे : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या खांद्यावर बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. तेव्हापासून बारामती (baramati) लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. आता भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या खांद्यावर निर्मला सितारामन यांच्या बारामती दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी राम शिंदे यांच्याकडे आहे. (ncp supriya sule slams Ram Shinde)

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. 22, 23 व 24 सप्टेंबर रोजी निर्मला सितारमन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. 6 सप्टेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामती दौरा आहे. यामध्येच निर्मला सितारमन यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर होईल'' असं राम शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी सांगितले.

शिंदेंच्या या विधानाबाबत पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना आज (रविवारी) विचारले असता, त्यावर सुळे यांनी राम शिंदे यांना चिमटा काढला आहे. "राम शिंदे बारामती पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करते. बारामती पाहण्यासारखी आहे. नरेंद्र भाई मोदी, अमित शहा आणि महत्त्वाचे नेते सगळे बारामतीत आले आहेत. मी लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत करेन. त्यांना कोणती संस्था पाहायची असेल तर मी त्यांना स्वत: घेऊन जाईल,"

मनसे नेते राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्या गाठीभेटीबाबत सुळे म्हणाल्या, "भाजपला कुठलीही दडपशाही नाही. त्यांच्यात कोणी कुणाला भेटू शकतो," "राज्यातील सत्ताधाऱ्यांनी 50 खोके घेऊन लाल दिवा ओरबाडून मिळवला. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात," अशा शब्दात सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला.

 ram shinde, Nirmala Sitharaman, supriya sule
दादा हा 'शो' नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो'सारखा..; श्रीकांत शिंदेंनी अजितदादांना सुनावले..

सुळे म्हणाल्या, "ज्या उत्साहाने आमचं सरकार पाडलं त्या उत्साहाने कामे होत नाहीत,अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत. गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नेहमीच कुणाच्या तरी घरीच दिसतात,"

"महाविकास आघाडी सरकारचे सगळे नेते सकाळी 7 वाजल्यापासून कामे करत होती. तसेच दर शुक्रवारी मॅरेथॉन मिटिंग घ्यायचे.राज्यात पालकमंत्री नाहीत. कोव्हिड असो किंवा नसो अजित पवार सकाळी सहा वाजल्यपासून काम करत असायचे. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. दर आता पालकमंत्रीच नाहीत. त्यामुळे कामेही होताना दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मी मंत्र्यांची वेळ मागत आहे. पण वेळ मिळत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल." असे सुळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com