NCP : बारामती जिंकण्याचे भाजपचे स्वप्न कधीचं पूर्ण होणार नाही ; राष्ट्रवादीनं सुनावले खडे बोल

NCP : "लोकसभेचे नंतर बघू ,आधी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या,"असे आव्हान गारटकर यांनी भाजपला दिले.
Pradeep Garatkar
Pradeep Garatkarsarkarnama
Published on
Updated on

इंदापूर (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने (bjp) रणनीती आखली आहे. आता राष्ट्रवादी कॉग्रेसही आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar)यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. "लोकसभेचे नंतर बघू ,आधी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या,"असे आव्हान गारटकर यांनी भाजपला दिले.

"भाजपने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मिशन बारामती मोहीम हाती घेतली आहे. त्यापूर्वी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात. जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्यानेचं त्या निवडणुका लांबवल्या आहेत. यामुळे भाजपचे बारामती लोकसभेचे स्वप्न कधीचं पूर्ण होणार नाही," असे गारटकर म्हणाले.

प्रदीप गारटकर म्हणाले, "लोकसभा 2024 ला आहे. किमान ती तरी निवडणूक वेळेत घ्या.नाहीतर आत्मविश्वास नाही म्हणून त्याही निवडणूका पुढे ढकलू नका. इतर निवडणुका तुम्हाला जिंकण्याचा आत्मविश्वास नसल्यानेचं तुम्ही लांबवल्या आहेत. हे सामान्य लोकांनादेखील समजत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अगोदर घ्या.त्यात काय जनता कौल देतीय ते बघा.नंतर लोकसभेची चर्चा करा,"

Pradeep Garatkar
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या गणेश दर्शनात चर्चा वाहतूक कोंडी अन् 'ओएसडी' राहुल गेठे यांची..

बारामतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बदल घडवून दाखवू असं वक्तव्य केलं. मात्र या मतदार संघातील लोकांना बदल घडावा असे वाटत नाही. लोकांना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत बावनकुळेंना असे वाटून काय उपयोग? असा प्रतिसवाल गारटकर यांनी केला आहे.

"बारामती मतदार संघात आर्थिक सुबत्ता, भौगोलिक विकास या बरोबरचं कृषी,तंत्रज्ञान, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रात आमूलाग्र बदल खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे. विरोधातील खासदार असुन देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघापेक्षा अधिक विकास बारामती लोकसभा मतदार संघात केला आहे,"असे ते म्हणाले.

गारटकर म्हणाले,"वयोश्री योजनेच्या माध्यमातून त्या गोरगरीबांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचल्या. साहित्याचे वाटप मोठ्या प्रमाणात केले.याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेस एक केडर असून ते खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबर आहे. या केडरमुळेचं असे मोठे असंख्य उपक्रम मतदार संघात होत असतात,"

संसदेत सर्व विषयांवर मत मांडणे,आक्रमक पद्धतीने बोलणे. संपूर्ण देशातील एकाही खासदाराचा लोकसंपर्क असू शकत नाही तेवढा संपर्क सुप्रिया सुळे यांचा मतदार संघात आहे.त्यामुळे बावनकुळेंची वाक्य ही हवेतचं विरळतीलं असा विश्वास गारटकर यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com