Bawankule News : बावनकुळेंकडून अजितदादांची पाठराखण, भाजप पदाधिकाऱ्यांनाच सुनावले.

Pune Political News: म्हणाले, पालकमंत्री होणार तो आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना निधी देणारच
chandrashekhar Bawankule
chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी दिल्यानंतर पालकमंत्री पवार केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झुकते माप देत मोठ्या प्रमाणात निधी देत असल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

शहरातील भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी केलेल्या तक्रारीनंतर याची उलटसुलट चर्चा शहरात सुरू झाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून पदाधिकाऱ्यांचेच कान टोचले आहे. ज्या पक्षाचा पालकमंत्री असतो, त्याने त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला झुकते माप देणे स्वाभाविकच आहे. मात्र हा निधी दिल्याने विकास हा शहराचाच होणार आहे हे लक्षात घ्यायला हवा, अशा शब्दात बावनकुळे यांनी भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करत पालकमंत्री अजितदादांची पाठराखण केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

chandrashekhar Bawankule
Pune Public issue: नववर्षात पुणेकरांवर येणार 'हे' संकट

शहरात पाच वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडेच होते. ते विरोधी पक्षात असल्याने निधी वाटपामध्ये अडचणी होत्या. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शहराचे पालकमंत्रिपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे होते. त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांना कामासाठी योग्य पद्धतीने निधी मिळत होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे शहराचे पालकमंत्रिपद द्यायचे की चंद्रकांत पाटील यांच्याकडेच शहराचे पालकमंत्रिपद ठेवायचे यावरून जोरदार खल सुरू होता. अजितदादा सत्तेत सहभागी झाले असले तरी त्यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यास शहरातील भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यामुळे शहराचे पालकमंत्रिपद मिळविण्यात चंद्रकांतदादा की अजितदादा यशस्वी ठरणार यावरून जोरदार चर्चा रंगत होती. अखेर अजितदादा वरचढ ठरले.

(Edited By - Chaitanya Machale)

chandrashekhar Bawankule
Sangali News : हे म्हणे शेतकऱ्यांचं सरकार... नुकसान हजार कोटींचं; मदतीचा प्रस्ताव 35 कोटींचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com