Santosh Deshmukh Case : एका आमदारामुळे राज्य नासतंय; वैभवी देशमुख हिची अजितदादांकडे मोठी मागणी

Vaibhavi Deshmukh protest march Baramati Beed Santosh Deshmukh murder NCP Ajit Pawar : बीड संतोष देशमुख हत्येत न्याय मिळावा यासाठी बारामतीमध्ये काढलेल्या मोर्चात वैभवी देशमुख हिती अजित पवार यांच्याकडे मोठी मागणी केली.
Vaibhavi Deshmukh
Vaibhavi DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Beed Santosh Deshmukh Murder : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येत न्याय मिळावा, यासाठी बारामती इथं मोर्चा काढण्यात आला होता. मयत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देखील मोर्चात सहभागी झाली होती.

त्यात वैभवी हिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्यायाची मागणी करताना, मोठं विधान केलं आहे. वैभवी देशमुख हिचा बोलण्याचा इशारा हा माजी मंत्री धनंजय मुंडेंकडे होता. पण तिने संपूर्ण मोर्चात त्यांचे नाव घेतले नाही.

वैभवी देशमुख म्हणाली, "अजित पवारांना (Ajit Pawar) विनंती आहे की, माझे वडील गेलेत, आम्ही न्याय मागतो आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा. तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे हे राज्य नासत चालले आहे. त्याला तुम्ही पाठीशी घालू नका".

Vaibhavi Deshmukh
Chhagan Bhujbal : महात्मा जोतिराव फुलेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवर छगन भुजबळांचं मोठं विधान

'बीडमध्ये (BEED) त्यांच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. अजितदादांना विनंती करते की, अनेक प्रकरणे घडली आहेत, त्याची सुद्धा खोल तपासणी करा. मी असं ऐकलं आहे, आणि बघितले आहे की, दादा असे व्यक्तिमत्व आहेत की, ते खऱ्याचं खरं करतात, खोट्याचं खोटं करतात. त्यामुळे या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा', असेही वैभवी देशमुख हिने म्हटले.

Vaibhavi Deshmukh
Maharashtra latest news : '...तर तुझा बाबा सिद्दीकी करू', माजी नगरसेवकाला भर लग्नसमारंभात मिळाली धमकीची चिठ्ठी; जेलमधील भाजपच्या माजी आमदारावर संशय

धनंजय मुंडे यांच्या सहभागावर बोलताना, वैभवी देशमुख हिने, आमची पहिल्यापासून एकच भूमिका आहे, वडिलांना न्याय मिळाला पाहिजे.खंडणीमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली, ती खंडणी नेमकी जातेय कोणाकडे हा सुद्धा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. घटना झालेली असताना देखील अशाच घटना घडत आहेत. हे फोटो तुम्हीच व्हायरल केले आहेत. ज्यात आरोपी मृतदेहासमोर असताना ते अमानुष छळ करत आहेत. याच्यामागे कोणाचा तरी हात आहे. मोठा पाठिंबा आहे, असा आरोप केला.

संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आस लावून बसला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागणी तिच आहे की माझ्या वडिलांना न्याय द्या, असे सांगत वैभवी देशमुख हिने भावनांना वाट मोकळी करून दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com