Amit Shah News : विश्वासघात करणाऱ्यांना कधीही माफी नसते; अमित शाहंनी स्पष्टच सांगितलं..

Amit Shah : अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Amit Shah News
Amit Shah News Sarkarnama

Pune News : ''निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यामुळे 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' केलं आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) -भाजप (BJP) युती म्हणूनच लढेल'', असं म्हणत अमित शाह यांनी 2024 च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत.

अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागपूर (Nagpur), पुणे (Pune) येथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच पुण्यात शनिवारी (दि.18 फेब्रुवारी) त्यांच्या हस्ते'मोदी @20' या पुस्तकाच्या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. याबरोबरच त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही भाष्य केलं.

Amit Shah News
Amit Shaha : रक्ताचे पाट वाहतील, असे सांगत होते; आता साधा दगड उचलण्याचीही कुणाची हिंमत नाही !

शाह म्हणाले, ''हे पुस्तक मोदींचे जीवन, त्यांचा महिमा किंवा भाजपचा आलेख सांगणारे नाही. तर हे पुस्तक भारतातील समस्यांचे निराकरण आणि उज्ज्वल भविष्यातील वर जाणारी रेषा दाखविणारे आहे. मोदींना पंतप्रधान बनण्यासाठी त्यांची पूर्वीची ३० वर्षांची तपश्चर्याही महत्वाची आहे'', असंही ते यावेळी म्हणाले.

''आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच लढणार आहे. त्यामुळे सर्व मतं हे भाजप आणि शिवसेनेच्या खात्यात आले पाहिजे. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. पण जे लोक धोका देतात. विश्वासघात करतात त्यांना कधीच माफ करायचं नसतं. अन्यथा त्यांची हिम्मत वाढत असते'', असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर घणाघात केला.

Amit Shah News
Shinde Vs Thackeray : शिंदे गट आणखी एक नवा डाव टाकण्याच्या तयारीत; ठाकरेंच्या उत्तराकडे असणार महाराष्ट्राचे लक्ष

''धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं. एका पत्रकाराने विचारलं की, धनुष्यबाण तुम्हाला मिळालं. तेव्हा ते म्हणाले की, धनुष्यबाण आम्हाला मिळाले नाही तर ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे गहाण पडले होते ते सोडवून आणले. हे त्यांचं भाष्य अत्यंत योग्य होतं'', असं अमित शाह यांनी यावेळी म्हटलं.

Amit Shah News
Shivsena Symbol : शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर अमित शाहंचे मोठे विधान; म्हणाले...

''आमच्या बरोबरचा धोका तर सोडाच पण त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी देखील धोका केला. तसेच शिवसैनिकांशी देखील धोका केला आहे. पण आयोगाने निर्णय योग्य दिला आहे'', असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com