Pune Assembly Election : बीबीसी कालवा अस्तरीकरण शेतकऱ्यांसाठी ठरणार मैलाचा दगड - आमदार राहुल कुल

‘‘सध्या सुरू असणारे बीबीसी (भिगवण शाखा कालवा) कालवा अस्तरीकरण हे दौंडच्या पूर्व भागातील १० गावांसाठी मैलाचा दगड ठरणार असून, यासाठी आपण ९ कोटी ५९ लाख रुपये राज्य शासनाकडून मंजूर केले आहेत.
Rahul Kul
Rahul KulSarkarnama
Published on
Updated on

खुटबाव : ‘‘सध्या सुरू असणारे बीबीसी (भिगवण शाखा कालवा) कालवा अस्तरीकरण हे दौंडच्या पूर्व भागातील १० गावांसाठी मैलाचा दगड ठरणार असून, यासाठी आपण ९ कोटी ५९ लाख रुपये राज्य शासनाकडून मंजूर केले आहेत. कालवा अस्तरीकरणाचे काम जलदगतीने चालू असून, लवकरच बीबीसी कालवा हा पूर्व भागातील गावाची जीवनवाहिनी ठरेल,’’ असा आशावाद दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.

बोरीबेल, गोपाळवाडी, लिंगाळी, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, शिरापूर येथे आयोजित प्रचार दौऱ्यामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘खडकवासला प्रकल्पाच्या बीबीसी कालव्याची जीर्ण बांधकाम, कठडे तुटल्याने, आतमध्ये झाडेझुडपे वाढल्याने दुरवस्था झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असे.

परिणामी ऐन उन्हाळ्यामध्ये शेतीचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचत नव्हते. मी शासन पातळीवर या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी पाठपुरावा केला. निवडणूक आचारसंहितेपूर्वी या कालव्याचे आपण भूमिपूजन केले.

भविष्यात या कालव्यामुळे दौंडच्या पूर्व भागातील येडेवाडी, खोरवडी, आलेगाव, बोरीबल, देऊळगावराजे, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, लोणारवाडी, मलठण, राजेगाव या भागामध्ये हरितक्रांती येणार आहे. गेली अनेक वर्षे उन्हाळ्यामध्ये भीमा नदीला पाणी कमी पडत आहे.

बीबीसी कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास उन्हाळ्यातील शेती पिकाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे त्यामुळे या भागाचे अर्थकारण बदलणार आहे. तसेच, बोरीबेल व पूर्व भागातील ५ गावांना जोडणारे रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न आपण मार्गी लावत आहोत. यासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आगामी १ वर्षांमध्ये हे काम पूर्ण केले जाईल.’’

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महेश भागवत म्हणाले, ‘‘रमेश थोरात यांच्या भाषणावरून निवडणूक विधानसभेची चालू आहे की पुणे जिल्हा बँकेची चालू आहे, हेच समजत नाही. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी अनेक जणांचे योगदान आहे, कोणी एकट्याने त्याचे श्रेय घेऊ नये. थोरात हे जिल्हा बँकेच्या ठेवी वाढल्या, असे सांगत आहेत, परंतु प्रत्यक्षात आकडेवारी पाहिल्यास तेवढे गुणोत्तर अथवा हिशोब येत नाही.’’

बोरबेल येथे सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सुशीला चव्हाण म्हणाल्या, ‘‘आमचे नातेवाईक आजारी होते. यावेळी डॉक्टरांनी २ लाख रुपये खर्च सांगितला होता. अशावेळी आमदार कुल यांनी स्वतःहून पुढे येत पेशंटला पुण्यातील चांगल्या दवाखान्यात दाखल केले. आमदारांनी पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी आणण्यासाठी गाडी पाठवली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर भेटण्यासाठी आले. कुल यांचे आरोग्याचे काम पाहून मी कृतज्ञ आहे. असा आरोग्यदूत आमदार आम्ही आजतागायत पाहिलाच नाही.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com