
Pune News : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाचा सर्वस्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. राजकीय राजकीय पक्षांसह विविध संघटनांकडून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी तब्बल 15 पक्ष आणि संघटनांनी रुग्णालयासमोर येत प्रशासनाचा निषेध नोंदवला. भाजप महिला आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक होत एक हॉस्पिटलमध्ये तोडफोड देखील केली.
त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर होते. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्याच वेळी भिसे यांच्या कुटुंबानी सीएम फडणवीस यांची भेट घेऊन मोठी मागणी केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात काय कारवाई केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यानंतर त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. यावरती नक्कीच कारवाई होईल आणि भविष्यात अशास्वरूपाच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल. रोष फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर आहे. हा लढा फक्त माझ्या एकट्याचा राहिला नसून संपूर्ण जनतेचा हा लढा झाला असल्याचे भिसे यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले.
डॉ. घैसास यांचे लायसन रद्द करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. तुम्हाला न्याय मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. संपूर्ण हॉस्पिटल हे धर्मदाय व्हावे आणि रुग्णाला योग्य उपचार मिळावेत, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमचा राग हा त्या दिवशीसाठी आहे. लोकांची दिशाभूल करू नका, त्या दिवशीचा सीसीटीव्ही दाखवा. पेशंट क्रिटिकल होते हे तुम्ही म्हणत असाल तर मग तुम्ही उपचार का नाहीत. तुम्ही साधी सुई देखील लावली नाही अथवा गोळी सुद्धा दिली नाही, हे आधी सांगा आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी बोला, असेही भिसे यांच्या कुटुंबाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, जी माहिती आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत, तीच माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिली आहे. ज्या गोष्टी आमच्या सोबत घडल्या आहेत. त्या सर्व पोलीस प्रशासनाला सांगितल्या आहेत, असे देखील भिसे यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.