
Bhor Grampanchayat : भोर तालुक्यातील पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यकाल संपलेल्या दहा ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. टिटेघर, नांदगाव, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख, पळसोशी, जयतपाड, कांबरे बुद्रुक, कुरुंजी, माळेगाव, वडतुंबी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी दिली
भोर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींचा कार्यकाल जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ या कालावधीत संपणार आहे. या ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडल्याने प्रशासकांची नेमणूक करण्याबाबत शासनाने यापूर्वीच आदेश दिले होते. यानुसारच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार संबंधित तालुक्याच्या पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासक म्हणून ग्रामसेवकपदापेक्षा वरिष्ठ कर्मचारी प्रशासक म्हणून नेमण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार आता गाव कारभाऱ्यांच्या हातातून प्रशासकांकडे गेला आहे.
भोर पंचायत समितीमधील पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी एच जे पवार यांची टिटेघर, वरोडी डायमुख व वडतुंबी ग्रामपंचायतीसाठी प्रशासन म्हणून नियुक्ती करण्यात आली. कृषी विभागाचे विस्तार अधिकारी व्ही. एच. कोळी यांची नांदगाव नांदगाव ग्रामपंचायतीवर, एच टी वाघ यांची वरोडी बुद्रुक ग्रामपंचायतीवर, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी डी. एस. चांदगुडे यांची पळसोशी व जयतपाड ग्रामपंचातीवर तर पंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी श्रीमती ए आर दंडे यांची कांबरे बुद्रुक, कुरुंजी व माळेगाव या तीन ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.