Mahesh Landge : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच, धर्मवीर की धर्मरक्षक वादात महेश लांडगेंचीही उडी

Mahesh Landge News : भाजपकडून राज्यभर आंदोलन सुरु आहेत.
Mahesh Landge and Ajit Pawar
Mahesh Landge and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’नव्हे ‘स्वराज्यरक्षक’ होते, असं मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे बोलताना नुकतेच व्यक्त केले होते. त्यावरून भाजप आक्रमक झाली असून त्यांनी या विधानाच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या पक्षाचे पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी सुद्धा या वादात आज उडी घेतली.

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, असे म्हणणाऱ्या भाजपने अजित पवारांच्या वक्तव्याच्या विरोधात आज पुण्यात आंदोलन केले. यावेळी अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

जळगावात, तर भाजपने अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध केला. छत्रपतींच्या घराण्याचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे यांनीही अजित पवारांच्या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत ते अर्धसत्य बोलले, असे सांगितले. छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक आहेतच, शिवाय ते धर्मवीर देखील होते, असे ते म्हणाले.

Mahesh Landge and Ajit Pawar
Grampanchayat : संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्यासाठी पाच लाखाची खंडणी ; पत्राने खळबळ..

दरम्यान, या वादावर पिंपरी-चिंचवडमधून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि जगाच्या शेवटापर्यंत त्यांचा हा गौरव अबाधित राहणार, असे प्रत्युत्तर आज दिले. देव, देश अन् धर्मासाठी माझ्या शंभूराजानं प्राण हाती घेतलं होतं, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

तसेच आपल्या फेसबुक पेजवरही त्यांनी हे आपले विधान ठामपणे मांडले आहे. मात्र, टीका करतानाही आदरयुक्त राजकारण करणारे (politics with respect) आणि अजितदादांचे पूर्वाश्रमीचे सहकारी असलेल्या महेशदादांनी यावरून अजितदादांचा निषेध करणं, मात्र टाळलं आहे.

Mahesh Landge and Ajit Pawar
BJP Mission 45: भाजपचे 'मिशन ४५'; शिरूर लोकसभा मतदारसंघात नड्डांच्या होणार दोन जाहीर सभा

तसेच त्यांच्यावर कडवट टीकाही त्यांनी केलेली नाही. शंभूप्रेमी पैलवान आमदार लांडगे यांच्या मतदारसंघात मोशी येथे त्यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारीत आहेत. तेथे एकशे चाळीस फुट उंचीचा संभाजीराजेंचा पुतळा उभारला जाणार असून त्यात चाळीस फुटांचा केवळ चौथराच आहे.

नॉयडा, दिल्ली येथे हा पुतळा तयार केला जात असून त्याचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. स्मारकाच्या या पहिल्या टप्यात ४६ कोटी रुपये खर्च येणार आहे. दुसऱ्या टप्यात तेथे साकारण्यात येणाऱ्या ८४ म्यूरल्समधून संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या पुतळ्याचे या वर्षी उद्घाटन करण्याचा आ.लांडगेंचा मानस आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com