Anil Ramod is Habitual Offender : अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने दि. ९ जून रोजी रंगेहात पकडले. त्यांना चौकशीनंतर अटक केली. सध्या रामोडांना २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात रामोड 'हॅबीच्युअल ऑफेंडर' असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, रामोड यांच्यावर मोठ्या कारवाईची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)
पालखी महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी रामोड यांनी लाच मागितली होती. यानंतर अॅड. याकूब साहेबू तडवी यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून सीबीआयच्या पथकाने रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेतना अटक केली. अॅड. तडवी यांनी रामोड हे एक कोटी रुपयांचा मोबदला देण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, रामोड यांनी अनेक प्रकणात टक्केवारी घेतल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर सीबीआयनेही रामोड लाचखोर असल्याचा ठपका ठेवला. या पार्श्वभूमीवर अनिल रमोड यांना सेवेतून निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. (Anil Ramod News)
पुणे विभागातील तब्बल ३७४ प्रकरणे अतिरिक्त विभागीय आयुक्त असलेल्या रामोड यांनी प्रलंबित ठेवल्याचे आता समोर आले आहे. यासह त्यांची बेहिशेबी मालमत्ताही मोठ्या प्रमाणात असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.
रामोड यांना सेवेत ठेवल्यास तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली. त्यामुळे त्यांना निलंबीत करावे, अशा मागणीचे पत्र सीबीआयने विभागीय आयुक्तलयाला दिले आहे. या पत्रानुसार रामोड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
डॉ. अनिल रामोड हे 'क्लास वन' अधिकारी असल्याने त्यांच्या निलंबनाचा अधिकार राज्य सरकारला आहे. आता तपासाचे कारण सांगून सीबीआयने रामोड यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यानुसार विभागीय आयुक्तलयाकडून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तो प्रस्ताव मान्यतेसाठी लवकरच राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.