Anil Ramod judicial custody : लाचखोर अनिल रामोडांना २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

Pune News : रामोडांची येरवडा कारागृहात रवानगी
Anil Ramod
Anil RamodSarkarnama
Published on
Updated on

Anil Ramod in Court Custody : पुण्यातील महसूल विभागतील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना शुक्रवारी (ता. ९ जून) लाचप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई 'सीबीआय'ने केली. त्यांना आठ लाख रुपायांची लाच घेताना अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांना 'सीबीआय' न्यायालयाने १३ जूनपर्यंत 'सीबीआय' कोठडी सुनावली होती. आता त्यांना २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानुसार त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. (Latest Marathi News)

Anil Ramod
The Chief Minister saved Sattar again : मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या सत्तारांना पुन्हा अभय ; राजीनाम्याऐवजी कानपिचक्यांवर भागले...

जामीन मिळाल्यास रामोड पुराव्यात छेडछाड करू शकतात, शासकीय कर्मचारी, साक्षीदारांवर दाबव आणू शकतात यासह त्यांच्या कार्यालयासह इतर ठिकणांहून पुरावे जमा करायचे आहेत असे कारण 'सीबीआय'च्या वतीने न्यायलयात देण्यात आले. दरम्यान, तपासात रामोडांकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि मालमत्ता आढळली. त्यानुसार त्यांची आणखी बेहिशेबी मालमत्ता खरेदी केल्या का, याबाबत तपास करण्याचेही कारण देण्यात आले. त्यामुळे रामोडांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती 'सीबीआय'कडून केली होती. ती विनंती न्यायालयाने मान्य केली.

Anil Ramod
Anil Ramod News: लाचखोर अनिल रामोड यांच्यानंतर तीन डझन अधिकारीही सीबीआयच्या रडारवर....

दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर अनिल रामोड यांच्या कार्यालयासह बाणेर (पुणे) आणि नांदेड येथील घरांवर 'सीबीआय'ने छापे टाकले. या कारवाईत 'सीबीआय'ने तब्बल सहा कोटी रुपयांची रोकड आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. अनिल रामोड यांना पालखी महामर्गासाठी भूसंपादनच्या मोबदल्यातील लाच प्रकरणी अटक केली आहे.

मोबदला देण्यासाठी त्यांनी रेटच काढल्याचा तक्रारदार अॅड. याकूब साहेबू तडवी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी रामोडांच्या एक कोटी रुपये मोदबदल्याच्या बदल्यात १० लाख रुपये लाच घेत असल्याचे सांगितले. दरम्यान, रामोड यांच्या पुणे आणि नांदेड येथील घरातून मोठ्या प्रमाणत बेहिशेबी रोकडसह संपत्ती हाती लागली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागासह राज्यात खळबळ उडाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com