NCP Leader Join Congress : अलिबागमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Raigad Political News : '' सध्याची परिस्थिती काँग्रेसला पोषक आहे...''
NCP Leader Join Congress
NCP Leader Join Congress sarkarnama
Published on
Updated on

Khopoli : आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामुळे मतदारसंघातील आढावा बैठका, दौरे यांना वेग आला असतानाच राजकीय पक्षातील इन्कमिंग आणि आऊटगोईंग देखील सुसाट आहे. अलिबाग येथे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते , केटीएसपी मंडळाचे माजी अध्यक्ष व शैक्षणिक क्षेत्रातील प्रसिद्ध वसंत विद्या ट्रस्टचे अध्यक्ष उल्हासराव देशमुख यांनी बुधवारी(दि.१४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

NCP Leader Join Congress
Congress Insist For Maval : राष्ट्रवादीच्या 'मावळ'वर काँग्रेसचा डोळा; थेटच मांडलं विजयाचं गणित

काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, माजी अध्यक्ष व जेष्ठ नेते अॅड. जे टी पाटील , रायगड जिल्हा प्रभारी श्रीमती चारुलता टोकस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी रायगड जिल्हा निरीक्षक बर्गे , राणी अग्रवाल ,रायगड जिल्हा महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकुर, रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर , खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन यांच्यासह खोपोली शहर काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अलिबाग येथील रायगड जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला होता. अत्यंत अनुभवी, अभ्यासू व आक्रमक वक्ते असलेले उल्हासराव देशमुख यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशानं खोपोलीसह रायगड जिल्हा काँग्रेस (Congress) लाही बळ मिळणार असल्याचं जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, जे टी पाटील व अन्य मान्यवरांनी सांगून देशमुख यांचे जोरदार स्वागत केले.

NCP Leader Join Congress
Shrirang Barne Big Statement : मावळ लोकसभेवर खासदार बारणेंचा दावा, २०२४ ला युतीचा उमेदवार म्हणून केली स्वत:च घोषणा

राष्ट्रवादीच्या 'मावळ'वर काँग्रेसचा डोळा

यावेळी महेंद्र घरात (Mahendra Gharat) यांनी युतीच्या उमेदवाराचा पराभव करणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, "या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा सलग तीन वेळा पराभव झालेला आहे. सध्याची परिस्थिती काँग्रेसला पोषक आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, कर्नाटकमध्ये काँग्रेसने मिळवलेला विजय, यासह पोटनिवडणुकांमध्येही पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. मावळ मतदारसंघात शेकापचे विवेक पाटील, ठाकरे गटाचे मनोहर भोईर यांची ताकद आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या मतदारांच्या मदतीने विरोधकांवर मात करणे शक्य आहे."

जिल्हा कमिटीची नव्याने रचना

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने रायगड(Raigad) जिल्हा काँग्रेस कमिटीची नव्याने रचना करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह तीन वरिष्ठ उपाध्यक्ष, २९ उपाध्यक्ष, १९ सरचिटणीस नियुक्त करण्यात आले आहेत. पूर्वीचे दिवस प्राप्त करून देताना अगदी शून्यातून सुरुवात करण्यास काँग्रेस कमिटीची रचना करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसच्या रायगड जिल्हा प्रभारी चारुलता टोकस यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com