ATS Action In Pune
ATS Action In PuneSarkarnama

ATS Action In Pune : 'एटीएस'ची पुण्यात मोठी कारवाई; जयपूर बॉम्बस्फोटातील आरोपींना 'आसरा' देणाऱ्याला बेड्या

Pune Crime News : मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी हे जयपूर बॉम्बस्फोटामधील फरार आरोपी आहेत.

Pune : पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती. पुण्यात आयसिसशी संबंधित असलेल्या दोघांना अटक केल्यानंतर राज्यभरात एटीएसने कारवाई सुरू केली आहे. पुण्यानंतर एटीएसने आता तपासाचे चक्रे वेगाने फिरवली असून रत्नागिरीतील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आता दहशतवादविरोधी पथकाने गुरूवारी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा देणाऱ्या एकाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली.

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा देणाऱ्या कोंढवा येथील एकास दहशतवाद विरोधी पथकाने(ATS) अटक केली. अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पठाण कोंढवा भागात वास्तव्य करत असून त्याचा ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे.

ATS Action In Pune
Pune Police : पुणे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! 'मोस्ट वॉन्टेड' आणि 'NIA'च्या रडारवर असलेल्या दहशतवाद्यांना बेड्या

कोथरूड (Kothrud)पोलिसांच्या पथकाने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३), मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब साकी यांना दुचाकी चोरीच्या संशयातून पकडण्यात आले होते. घराची झडती घेतल्यानंतर त्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध पुढे आले होते. ते जयपूर बॉम्बस्फोटामधील फरार आरोपी आहेत.ते एनआयएच्या रडारवर होते.

मोहम्मद खान आणि मोहम्मद साकी हे जयपूर बॉम्बस्फोटामधील फरार आरोपी आहेत. यांच्यावर एनआयने गुन्हा दाखल केल्यानंतर हे दोघे मार्च २०२२ मध्ये मुंबईतील भेंडीबाजार येथे पळून आले होते. मुंबईत पकडले जाण्याच्या भीतीने हे दोन्ही दहशतवादी पुण्यात आले होते. ते पुण्यातील कौसर भाग येथील एका मशिदेमध्ये राहू लागले. तेव्हा त्यांची ओळख अब्दुल कादीर दस्तगीर पठाण याच्याशी झाली. या दोन्ही दहशतवाद्यां(Terrorist)आम्ही गरीब असून कामाच्या शोधात आलो असल्याचे सांगितले.

ATS Action In Pune
Pune ATS News: बॉम्बस्फोटाची चाचणी, संवदेनशील स्थळांचे चित्रीकरण; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांची धक्कादायक माहिती उघड

त्याने खान आणि साकी यांना ग्राफिक्स डिझाईनचे काम देत महिन्याला आठ हजार रुपये पगार दिला. तसेच अब्दुल पठाण याने चेतना गार्डनमधील अन्वर अली इद्रिस यांच्या मालकीची एक खोली भाड्याने घेऊन या दहशतवाद्यांना राहायला दिली. या खोलीचे ३ हजार ५०० रुपये भाडे अब्दुल या दोघांकडून घेत असे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. एस. कचरे यांनी दिले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com