Daund Market Committee elections : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलला ०९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला ०९ जागा मिळाल्या. माजी आमदार रमेश थोरात यांच्या बाजार समितीवरील वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे.
बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलला ०९ आणि भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा विकास पॅनेलला ०९ जागा मिळाल्या. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने सर्व १९ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले होते.
मात्र, २०२३ च्या निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने हे वर्चस्व मोडीत काढत १८ पैकी ०९ जागा जिंकल्या आहेत. यामुळे थोराग टाला धक्का बसल्याचे बोलेल जात आहे. समान जागा मिळाल्यामुळे सत्तास्थापनेमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सी खेच होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दौंडमध्ये सभा घेतील होती. त्यामुळे या निवडणुकीत काय होत, याकडे सर्वांचे लक्ष लागले होत.
यामध्ये दोन्ही पॅनला समान जागा मिळाल्यामुळे सत्तास्थापनेत कोण बाजी मारते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती वर्चस्व राखले होते. मात्र, यावेळी कुल यांनी जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला काहीसा धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.