Baramati News: सुप्रिया सुळेंना घेरण्यासाठी भाजपचं ओबीसी कार्ड; पडळकरांवर मोठी जबाबदारी

Baramati Lok Sabha Constituency: चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आपापला बालेकिल्ला राखण्यासाठी आणि इतर पक्षांचा बालेकिल्ला सर करण्यासाठी रणनीती ठरवत आहेत. असे असताना 'B फॉर बारामती'ची जबाबदारी भाजपने एका नेत्यावर सोपवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपची पहिल्यापासून नजर आहे. बारामती ताब्यात घेतली तर राष्ट्रवादी म्हणजेच पवारांची 'पॉवर' संपेल, असे भाजपचे गणित आहे. म्हणनच बारांमती ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती राबविले जात आहे. मिशन बारामतीचा भाग म्हणून बारामती लोकसभा प्रभारी म्हणून नवनाथ पडळकर यांच्या नावाची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Supriya Sule
Social Media: वाचाळ आमदारांची चलती, सामाजिक सलोख्यालाही नख लावण्याचे प्रकार

राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटलेला आहे. त्यातच बारामती लोकसभा क्षेत्रातील इंदापूर येथे झालेला ओबीसी एल्गार महामेळावा राज्यभर गाजला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने नवनाथ पडळकर यांच्या रूपाने ओबीसी कार्ड खेळण्याचा केला प्रयत्न असून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घेरण्याची रणनीती आखली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांच्यानंतर त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे येथून नेतृत्व करतात.केंद्रात सत्ता आल्यानंतर बारामतीची जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. पण त्यामध्ये अद्याप यश आलेले नाही.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेला अमेठी आणि शरद पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांकडून 'A फॉर अमेठी' आणि 'B फॉर बारामती' अशी घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यातील अमेठीची जागा भाजपने जिंकली. मात्र बारामतीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत 'B फॅार बारामती'ची जागा जिंकण्याचे नियोजन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केले आहे.

Edited by: Mangesh Mahale

Supriya Sule
Thackeray Vs Shinde: शंभर कोटींच्या कामावरून शिंदे-ठाकरे गटात रणकंदन; बिनशेपटीच्या वाघाच्या मुसक्या आवळा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com