Chandrakant Patil: साहेब-दादांच्या गोविंदबागेतील भेटीवर चंद्रकांतदादांची मिश्किल टिप्पणी

Maharashtra Politics: सुप्रिया सुळे काटेवाडीतील अजितदादांच्या निवासस्थानी भाऊबीजेच्या कार्यक्रमा निमित्ताने आल्या होत्या.
Maharashtra Politics news
Maharashtra Politics news Sarkarnama
Published on
Updated on

Pune: बारामतीत गोविंदबागेतील दिवाळी कार्यक्रमात अजित पवार उपस्थित राहणार की नाही, याची चर्चा दोन दिवसांपासून रंगली होती. पाडव्याच्या दिवशी रात्री स्नेहभोजनासाठी ते उपस्थित होते. आज (बुधवारी) सुप्रिया सुळे काटेवाडीतील अजितदादांच्या निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त आल्या होत्या.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गाठीभेटीविषयी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. चंद्रकांतदादा आज पु्ण्यात माध्यमांशी बोलत होते. "पवारांचे कुटुंब सण, लग्न असेल तर एकत्र येतात. पण शरद पवार आणि अजित पवार यांच्या डोक्यात काय चाललंय हे घटना घडल्याशिवाय कळत नाही," अशा शब्दांत चंद्रकांतदादांनी साहेब, दादांच्या भेटीवर टोला मारला आहे.

काल (मंगळवारी) पाडव्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या बारामतीतील गोविंदबाग परिसरातच अजितदादा होते. पण दुपारपर्यंत हे गोविंदबागेकडे फिरकलेच नाही. मात्र रात्री पाडव्याच्या कार्यक्रमात अजितदादांनी आपली उपस्थिती दर्शवली. खासदार सुप्रिया सुळेंनी हा फोटोही पोस्ट केला आहे.

Maharashtra Politics news
Sanjay Raut: बारामतीची कुस्ती शरद पवारच मारणार; अजितदादांना माती चारणार; राऊतांचा दावा

यावर चंद्रकांतदादांना याविषयी विचारले असता ते म्हणाले, "शरद पवार अन् अजित पवार हे एकत्र येत असले तरी त्याच्यातील मागचे मतभेद तसेच आहेत," ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही अजितदादांची खिल्ली उडवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हा वाद न्यायालयात सुरू आहे. यावर राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता '2024 मध्ये शरद पवारांचा पक्ष अजित पवारांना माती चारणार,' असा दावा त्यांनी केला आहे. "काही कौटुंबिक आणि संस्थात्मक गोष्टी असतात. अजित पवार आणि शरद पवार या दोघांचे बारामती मैदान एकच आहे. बारामतीची कुस्ती हे शरद पवार मारतील आणि महाराष्ट्रात सुद्धा तेच नेतृत्व करतील,” असे राऊत म्हणाले.

"महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोन नेते राहतील, जसे त्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार, आजही शरद पवार आपल्यासोबत आहेत. त्यावेळी दोनच नेत्यांचे राजकारण होते. आज शरद पवार पुन्हा एका संकटातून उभे राहत आहेत. आणि ते परत नेतृत्व करत आहेत. बाळासाहेब ठाकरे आज आपल्यासोबत नाहीत, पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघाले आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांचे राजकारण यापुढे महाराष्ट्रात यशस्वी झालेले दिसेल," असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

Maharashtra Politics news
Dhangar Reservation: धनगर आरक्षण पुन्हा पेटणार; यशवंत सेना आक्रमक, उद्यापासून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com