आयुक्तांवरील टीकेवरून भाजपमध्ये दुफळी

ओडिशा आयएएस केडरचे आयुक्त पाटील यांची नियुक्ती ही मूळात चुकीची असल्याचे भाजप (BJP) सदस्य सागर अंघोळकर यांनी सांगितले.
 Pimpri-Chinchwad

 Pimpri-Chinchwad

sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) हे पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावाखाली ते काम करीत असून त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे, असा खळबळजनक आरोप भाजपच्या (BJP) महापौर माई ऊर्फ उषा ढोरे आणि सभागृहनेते नामदेव ढाके यांनी गेल्या आठवड्यात (ता.१५) पत्रकारपरिषद घेऊन केला होता.

<div class="paragraphs"><p>&nbsp;Pimpri-Chinchwad</p></div>
धक्कादायक : गोव्यातील आमदाराची पुण्यातील मराठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी

अडवा आणि जिरवा असे धोरण आयुक्तांनी भाजपबाबत अवलंबले असून ते त्यांनी थांबवले नाही, तर त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढून अविश्वास ठराव आणू. असा इशाराही या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी दिला होता. त्याची पुनरावृत्ती शुक्रवारी (ता.२४) पालिका सभेत झाली. राष्ट्रवादीव त्यांच्या नेत्यांची सुपारी घेऊन आयुक्त काम करीत असल्याचा पुनरुच्चार भाजप नगरसेवकांनी आमसभेत केला. मात्र, त्यांच्याच दुसऱ्या एका नगरसेवकाने हा आरोप फेटाळून आयुक्तांचे समर्थन केले. दरम्यान, त्यावरून शहर भाजपमधील दुफळी तथा मतभेद स्पष्ट झाले.

ओडिशा आयएएस केडरचे आयुक्त पाटील यांची नियुक्ती ही मूळात चुकीची असल्याचे भाजप सदस्य सागर अंघोळकर यांनी सांगितले. सुपारी घेऊन वागणे आयुक्तांना शोभत नाही, असे ते म्हणाले. लोकसभेला पराभूत पार्थदादा पवारांची सुपारी घेऊन तुम्ही भाजपची जिरवण्यासाठी शहरात आले आहात, असा थेट आरोप त्यांनी केला. तरीही पुन्हा भाजपच सत्तेवर येणार आहे, हे लक्षात ठेवा. असे सांगण्यास ते विसरले नाहीत. कुठलेही पद नसलेल्या पार्थ यांच्यासोबत तुम्ही तुमच्या अँटी चेंबरमध्ये चर्चा करता आणि दुसरीकडे आम्हा नगरसेवकांना, मात्र वेळ देत नाही, असेही ते म्हणाले.

<div class="paragraphs"><p>&nbsp;Pimpri-Chinchwad</p></div>
धोका वाढला..! एका पाठोपाठ एक भाजपशासित राज्यांत रात्रीची संचारबंदी

हे तुमच्या पदाला शोभत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. त्याला राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी हरकत घेतली. आयुक्त फक्त दोन आमदारांसाठी आहेत का? आम्हालाही बोलता येते, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. भाजपचेच राहुल जाधव यांनीही आयुक्तांना लक्ष्य केले. तर, आयुक्तांना आम्ही नगरसेवक आहोत असे वाटतच नाही. कारण ते आमची सुपारी घेऊन आले आहेत. आम्ही त्यांना घरची कामे सांगत नाही. तरीही ते करीत नाहीत. दुसरीकडे हेतुपरस्पर कारवाई, मात्र करतात, असा आरोप त्यांनी केला. तर, आयुक्त हे सुपारी घेऊन आले नसल्याचे सांगत ते चुकीची कामे करण्यासाठी आयएएस झालेले नाहीत, असा घरचा आहेर भाजपला त्यांचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिला. आयुक्तांच्या कामाचे त्यांनी कौतूक केले. त्यांच्याकडे विधायक, लोकहिताची कामे घेऊन गेलात की ती नक्की होतात, असा शालजोडीतून त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com