पणजी : गोव्याचे माजी नगर विकास मंत्री आणि भाजपचे (BJP) आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांचे नाव सेक्स स्कँडलमध्ये आल्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हे प्रकरण गाजत असताना आता गोव्यातील आणखी एका आमदाराचा प्रताप समोर आला आहे. या आमदाराने पुण्यातील मराठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हवामान बदल चळवळीतील कार्यकर्त्या शमिता सृष्टी शर्मा (Shamita Srishti Sharma) यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे गोव्यात (Goa) खळबळ उडाली आहे. हे आमदार नेमके कोण याबाबत आता राजकीण चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचा एक आमदार आधीच वादा अडकलेला असताना आणखी एका आमदाराचे कृत्य समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शर्मा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, पुण्यातील (Pune) अभिनेत्री असलेल्या मैत्रिणीने मला ही माहिती दिली आहे. गोव्यातील एक आमदार आठ महिन्यांपासून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत आहे. या आमदाराने चार वर्षांपूर्वी अभिनेत्रीला चित्रपट मिळवून दिला होता. त्यावेळी तिच्याकडून आमदाराने चित्रपट दिग्दर्शकाला द्यायचे असल्याचे सांगून काही फोटो घेतले होते. त्याच फोटोंच्या आधारे हा आमदार अभिनेत्रीला ब्लॅकमेल करत असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
अभिनेत्रीने काम मिळण्यासाठी मदत मागितली होती. तिने चित्रपटात काम केले पण अद्याप पैसे मिळाले नाहीत. याचा अर्थ असा नाही की तिने मदत केलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवावेत, असंही शर्मा यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, शर्मा यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बीना नाईक यांनी संबंधित आमदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री या आमदारावर कारवाई करणार की अभिनेत्रीच्या पालकांनाच दोष देणार, अशी टीका नाईक यांनी केली आहे.
दरम्यान, मिलिंद नाईक यांचा सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandle) सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. मागील काही दिवसांपासून त्यावरून गोव्यातील राजकारण तापलं होतं. अखेर नाईक यांनी या प्रकरणाची चौकशी योग्यप्रकारे व्हावे, या उद्देशाने काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.