Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad Sarkarnama

Politics : 'चिंचवड'ची पोटनिवडणूक लाखाच्या लीडने जिंकण्याची भाजपची डरकाळी

Politics : चिंचवडची पोटनिवडणूक २६ फेब्रवारीला होत आहे.
Published on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने या मतदारसंघाची पोटनिवडणूक २६ फेब्रवारीला होत आहे. ती लाखाच्या फरकाने जिंकण्याचा निर्धार भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी काल शहर पक्षाच्या बैठकीत व्यक्त केला.

गतवेळी २०१९ ला जगताप यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांचा ३८ हजार ४९८ मतांनी पराभव केला होता. यावेळी त्याच्या अडीचपट लीड नेण्याचा निश्चय भाजपने (BJP) केला आहे. परंतू भावनेच्या लाटेतही तेवढे मताधिक्य मिळेल, अशी सद्यस्थिती नाही. हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असला, तरी पोटनिवडणुकीत होणारे कमी मतदान पाहता एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळण्याची शक्यता नाही.

Pimpri-Chinchwad
Imtiaz Jalil News : देसाईसाहेब माझ्याविरोधात मानहानीचा खटला कधी दाखल करणार ? तो कराच..

मात्र, आ.जगतापांनी गेल्या १९ वर्षांत विकासगंगा शहरात आणल्याने त्यांच्या मतदारसंघात पुन्हा पक्षाचाच आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे आ.लांडगे यांनी चिंचवड तयारीच्या पक्ष कार्यालयातील बैठकीत सांगितले.

त्यासाठी चिंचवडच्या १३ प्रभागात मैदानावर उतरून काम करण्याचे आदेश सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांनी दिले. प्रत्येकजण आपल्या लक्ष्मणभाऊंचा विकासाचा वारसा जपण्यासाठी ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे, असे ते म्हणाले.

Pimpri-Chinchwad
Politics : अनिल देशमुखांनी लिहिलं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र; काय आहे पत्रात?

दिवंगत आ.जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रदेश निमंत्रित सदस्य चंद्रकांत नखाते, अनुप मोरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, महिला शहराध्यक्षा उज्वला गावडे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, पेजप्रमुख, बुथ केंद्रप्रमुख, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com