Supriya Sule|भाजपला पराभव दिसू लागलाय; सुप्रिया सुळेंनी जखमेवर मीठ चोळलं...

Supriya Sule| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं बारामतीमध्ये त्यांचं स्वागत आहे.
Supriya Sule|
Supriya Sule|
Published on
Updated on

बारामती : वेगवेगळ्या सर्वेक्षणात भाजपला (BJP) निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव दिसतोय, म्हणून महानगरपालिका निवडणुका सातत्याने लांबणीवर टाकत आहेत. इतकेच नाही तर प्रशासकांच्या कारभारामुळे जनता वाऱ्यावर सोडली आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर केली आहे. सुप्रिया सुळे आज बारामती (Baramati) दोऱ्यावर आहेत.

मी नेहमीच बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असते. आजही २३ गावातील कचरा प्रश्नावर आंदोलन करणार आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबाबत विचारले असता. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामतीमध्ये त्यांचं स्वागत आहे.

Supriya Sule|
Dr. Sujay Vikhe Patil : मंदिरे कोटींची अन् ज्ञानमंदिरे...

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टक्केवारी घेतल्याच्या आरोप केला आहे. असा सवाल केला आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपकडे आता दुसरा मुद्दा राहिला नाही, आता आम्हाला त्याची सवय झाली आहे. पण भाजपला मला हा प्रश्न विचारायचा आहे की, नक्की त्यांचं काय चाललंय. भाजप नेत्यांकडून आतापर्यत ज्या ज्या नेत्यांवर आरोप करण्यात आले आणि नंतर ते भाजपमध्ये गेले तर त्यांना क्लिनचीट देण्यात आली. काल शिवसेना खासदार अरविंद सावंत बोलले की, भाजप हा भारतीय जनता लॉंड्री झाला आहे.

यातही दोन भाग आहेत. जर त्यांचा आरोप खोटा असेल त्यांनी त्यांच्या कुटूंबियांची आणि महाराष्ट्राची बदनामी केल्याची माफी मागितली पाहिजे. दूसरा मुद्दा म्हणजे, जर त्यांनी घोटाळा केला असेल तर तुम्ही त्यांना क्लिन चीट कशी देता. असे सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले आहेत.

भाजपकडून बारामतीला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. पण जनता सुजान आहे, भाजपचा हा खडखडाट बारामतीकरांना चांगलाच माहिती आहे. पण आम्ही आपली विकासाची कामं सुरूच ठेवणार आहोत. भाजपने आरोप केलेले शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने खरंच दिलासा दिला असेल आणि सरनाईक कुटुंबीय निर्दोष असेल तर, भाजपने जाहीर माफी मागितली पाहिजे, असही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com