Sharad Pawar : लोकसभा निकाल इम्पॅक्ट; शरद पवारांकडे 'इन्कमिंग', अजितदादांपाठोपाठ भाजपला 'दे धक्का'

Entry into NCP Sharad Pawar party will increase from Pune : पिंपरी-चिंचवडचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक विनायक रणसुंभे यांनी अजित पवार गटाची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे आले असून, भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी देखील शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.
NCP Sharad Pawar
NCP Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha 2024 Election News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. शरद पवार यांचा परफाॅर्मन्सने तर, भाजपला घामच फोडला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या दमदार कामगिरीमुळे पक्षाकडे काहींचा ओढा वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवडचे प्रवक्ते आणि माजी नगरसेवक विनायक रणसुंभे यांनी अजित पवार गटाची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे येत तुतारी हातात घेतली तर, भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी देखील शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.

प्रियंका बारसे या भोसरीमधून पहिल्यांदाच 2017 ला निवडून आल्या होत्या. प्रियंका शिक्षण बीए. बीएड् असून मुख्याध्यापिका आहेत. प्रियंका बारसे यांनी भाजप (BJP) सोडणे हा भोसरीतील पक्षातील दमदार आमदार महेश लांडगे यांना धक्का मानला जात आहे.

स्थानिक नेतृत्वाने आपल्या कामाची दखल न घेतल्याने तसेच आपल्याला संधी न दिल्याने पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. पवारसाहेब सर्वांना सांभाळून घेत असल्याने तसेच त्यांचे विचारही पटल्याने त्यांच्या पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. पुणे उद्योगनगरीत भाजपला खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे.

दरम्यान,लोकसभा निकालाचा इम्पॅक्ट म्हणून शरद पवार राष्ट्रवादीत उद्योगनगरीमध्ये घरवापसीबरोबर इनकमिंगही सुरु झाले आहे. आणखी पाच माजी नगरसेकांचा येत्या काही दिवसांत पक्षात होणार असल्याचे बारसेंच्या प्रवेशाचा मास्टर स्ट्रोक असल्याचे शरद पवार राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले.

रणसुंभे यांनी मुंबईत (Mumbai) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केला होता. आज बारसेंनीही मुंबईतच पाटील यांच्याच उपस्थितीत प्रवेश केला. 'रणसुंभेचे परत येणे हा तर, फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी तो बाकी है', असे शरद पवार राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष तुषार कामठे यांनी रणसुंभेच्या घरवापसीनंतर सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP Sharad Pawar
Jayant Patil: भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला; जयंतरावांनी सत्ताधाऱ्यांना झोडपले!

भाजपच्या पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराला कंटाळून बारसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे इम्रान शेख यांनी सांगितले. त्या लोकसभा निकालाच्या आधीपासून जयंत पाटील यांच्या संपर्कात होत्या. स्थानिक नेतृत्त्वाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला कंटाळून तसेच शरद पवारसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी प्रवेशानंतर मुंबईत सांगितले.

यशवंतराव चव्हाण सेंटरमधील या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर उपस्थित होते.

NCP Sharad Pawar
Daund Politics : दौंडला 20 वर्षांपासून थांबली घड्याळाची टिकटिक; रंजना कुल ठरल्या राष्ट्रवादीच्या शेवटच्या आमदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com