हिंम्मत असेल तर राजीनामा देऊन दोन हात करा : शहा यांचे ठाकरेंना आव्हान

महाराष्ट्राचे आघाडी सरकार म्हणजे तीन पायांची ऑटो रिक्षा आहे.
Amit Shah

Amit Shah

sarkarnama

Published on
Updated on

पुणे : एक वेळ मुख्यमंत्री बनले हिंम्मत असेल तर राजीनामा द्या, होऊन जाउद्या दोन-दोन हात, असे आव्हान भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले. भाजपशी विश्वासघात करून सत्तेवर बसले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ठरले होते की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणुका होतील व फडणवीसच मुख्यमंत्री असतील. मात्र, निवडणुका झाल्यावर विश्वासघात केला आणि सत्ता हस्तगत केली, अशी घणाघाती टिका शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

<div class="paragraphs"><p>Amit Shah</p></div>
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शहांनी केले भूमिपूजन मात्र, बंगळूरच्या घटनेचा उल्लेख नाही..

अमित शहा शनिवार पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज (ता. १९) त्यांनी पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्याचा मेळावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शहा म्हणाले, शिवसेनेने विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद मोदी यांचे नाव घेऊन लढवली. त्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. मात्र, शिवसेनेने सत्तेसाठी गद्दारी केली, असा आरोप शहा यांनी केला. विश्वासघात करुन सत्तेवर बसले. महाराष्ट्राचे आघाडी सरकार म्हणजे तीन पायांची ऑटो रिक्षा आहे. त्यांचे तीनही चाके वेगवेगळ्या दिशांना आहेत आणि ते चाके पंच्चर आहेत. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राचा विकास करु शकत नाही, असेही शहा म्हणाले.

या महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरवात पुणे महापालिकेच्या निवडणुकीतून होईल, असा इशाराही शहा यांनी दिली. नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि-डिझेलचे दर कमी केले. महाराष्ट्र सरकारने मात्र, दारुचे दर कमी केले. आम्ही दारुचे नाहीत तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यास सांगितले होते, असा चिमटा शहा यांनी काढला. या सरकारचे दोनच लक्ष्य आहे. एक वसुली आणि दुसरे राजकारणाचे गुन्हेगारी करणे. विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या सोबत जे झाले ते बदलायचे असेल तर पुण्यामधून त्याची सुरुवात करावी लागेल, असेही शहा म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Amit Shah</p></div>
एकटे लढणार आणि स्वबळावर येवून दाखवणार : चंद्रकांतदादांनी शिवसेनेला ललकारले

दरम्यान, शहा म्हणाले, भाजपमध्ये एक बूथ प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतो. माझ्या घरात कोणीच राजकारणात नव्हते. तरी सुद्धा पक्षाने मला राष्ट्रीय अध्यक्ष बनवले. भाजपमध्ये मागणाऱ्यांना काहीच मिळत नाही. जे काहीच मागणत नाही त्यांना कधीच मागयची गरज पडत नाही. कारण त्यांना पक्ष सगळ काही देतो. ७० वर्षात जगातील सगळ्यात मोठा पक्ष भाजप झाला आहे. आम्हला हम दो हमारे दो च्या माध्यमातून ज्यांनी हिनवले ते ५० वर अटकले. आम्ही दोन वेळा ३०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या, असा टोला शहा यांनी काँग्रेसला लगावला. भाजपमध्ये बूथ प्रमुख महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जिथे कल्पना होऊ शकत नाही, तेथेही भाजपचे सरकार बनवले. त्यासाठी संपर्क अभियान महत्त्वाचे आहे. त्या माध्यमातून आपण निवडणुका जिंकु शकतो, असा कानमत्र शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com