Chitra Wagh News : चित्रा वाघ यांनी महिला आयोगावर तथ्यहीन टिप्पणी करून, अयोगाची अप्रतिष्ठा केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात चित्रा वाघ यांनी खुलासा करावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आयोगाने दिला होता.
या पार्श्वभूमीवर आता ''मी एकटी म्हणजे आयोग, हे आधी डोक्यातून काढा, तसेच ती एकटीच माझी मैत्रीण नाही, तर या आधी ज्या आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्या देखील माझ्या मैत्रीणीच होत्या'', असं म्हणत चित्रा वाघ यांनी चाकणकरांना टोला लगावला आहे.
वेगवेगळ्या पेहरावावरून चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदच्या प्रकरणावरून राज्य महिला आयोगावर टीका करणाऱ्या भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाकडून नोटीस बजवण्यात आली. याबाबत रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले होते. तर आज चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत चाकणकरांना प्रतिउत्तर दिलं आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, ''मी एकटी म्हणजे आयोग, हे डोक्यातून काढून टाका. आयोगामध्ये इतरही सदस्य असतात. मला याआधीही असल्या ५६ नोटिसा आल्यात. त्यात अजून एकाची भर पडली. आम्ही काय गुळ, खोबर देऊन त्यांना आमंत्रण देण्यासाठी गेलो नव्हतो. मात्र तरी देखील त्यांनी या प्रकरणात उडी घेतली.
''महिलांचा आदर, सन्मान जपला जावा यासाठीच महिला आयोग स्थापन झालं असं त्यांनीच सांगितलं ना? मात्र सध्या आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती? हा प्रश्न निर्माण झालाय. पण आम्ही देखील तिथे काम करुन आलो आहोत, हे त्यांनीही लक्षात घ्यावं'', असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
तसेच त्यांना चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्या मैत्रीबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, ''ती एकटी माझी मैत्रीण नाही, मी महाराष्ट्राची अध्यक्ष होते. जितक्या अध्यक्ष होत्या, त्या सर्व माझ्या मैत्रिणीचं होत्या. मैत्रीत वितुष्ट नाही'', असंही त्या यावेळी म्हणाल्या. ''तसेच महिला आयोगामध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक देखील पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे मला पाठवलेली नोटीस ही सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली आहे का?'', असा सवालही यावेळी त्यांनी केला.
''आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं की, मुंबई पोलीस आयुक्तांनी कुठलीही दखल घेतली नाही. मात्र हे कशाच्या अधारावर सांगता? याबाबत मुंबई पोलिसांकडून खुलासा मागवला आहे का? आयोगासारख्या मोठ्या पदावर बसल्यानंतर देखील अशा प्रकारची विधाने त्यांना शोभत नाहीत. त्यांनी ही विधाने बंद केली पाहिजेत'', असं वाघ यावेळी म्हणाल्या. दरम्यान, यापुढेही काही झालं तरी महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असा इशाराही यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.