राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अन्‌ भाजपचे बडे नेते महिन्यांत तिसऱ्यांदा आले एकत्र!

पाटील व गारटकर एकत्र आल्याने इंदापुरातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
Harshvardhan Patil-Pradeep Gartkar
Harshvardhan Patil-Pradeep GartkarSarkarnama
Published on
Updated on

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूरमधील (Indapur) एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते (BJP), माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Gartkar) मागील महिन्यात दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र आले. त्यामुळे उडालेला राजकीय धुराळा खाली बसतो न बसतो तोच आज (ता. २६ सप्टेंबर) पुन्हा एकदा हे दोघे एकत्र आले. इंदापूर शहरातील धनंजयबापू वाशिंबेकर मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवासाठी तुळजापूरहून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांच्या स्वागत कार्यक्रमात पाटील व गारटकर एकत्र आल्याने इंदापुरातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. (BJP leader Harshvardhan Patil and NCP district president Pradeep Gartkar came together)

नवरात्र उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार तुळजापूरहून ज्योत घेऊन येणाऱ्या तरुणांसाठी धनंजय बापू वाशिंबेकर मेमोरियल फाउंडेशन आणि मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर नगरपालिकेसमोर फराळ व खिचडीचे वाटप करण्यात येते. त्यानिमित्ताने भाजप नेते हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर एकत्र आले होते.

Harshvardhan Patil-Pradeep Gartkar
गुलाम नबी आझादांनी केली नवीन पक्षाच्या नावाची घोषणा; झेंड्याचेही अनावरण

या वेळी दोघांनीही एकत्र देवीचे पूजन केले. त्यानंतर फराळ वाटप कार्यक्रमाचा प्रारंभ केला. पाटील व गारटकर हे एकत्र येण्याचा या महिन्यातील हा तिसरा योग होता. यापूर्वी गणेश उत्सवात गारटकर यांच्या घरी, त्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील मानाचा सिद्धेश्वर गणपतीच्या महाआरतीच्या वेळी दोघांनी सोबत आरती केली. आता विशेष बाब म्हणजे गारटकर यांच्या समर्थकांकडून तुळजापूरहून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी फळे व फराळांच्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यास हर्षवर्धन पाटील यांनी हजेरी लावत दोघांनी देवीची पूजा केली.

Harshvardhan Patil-Pradeep Gartkar
सपाटेप्रकरणी राष्ट्रवादीने बोलावली बैठक; अंतर्गत वादावरही अजितदादा घेणार झाडाझडती

राज्यासह पुणे जिल्ह्यात सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याबरोबर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी सातत्याने एकत्र येणे, हा चर्चेचा विषय इंदापूर तालुक्यात बनला आहे. या वेळी माजी नगरसेवक गजानन गवळी, अमर गाडे, अतुल शेटे, श्रीधर बाब्रस, संदीप वाशिंबेकर, मेघ:शाम पाटील, व्यंकटेश वाशिंबेकर, बाळासाहेब व्यवहारे, धनंजय पाटील, श्रीनिवास बानकर, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com