किरीट सोमय्या बारामतीत कोणावर निशाणा साधणार

प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केले आहेत
 Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

बारामती : राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांवर गेल्या काही दिवसांपासून आरोपांची राळ उठविणारे भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे उद्या बुधवारी (ता. ६ ऑक्टोबर) बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. बारामतीत ते काय तोफ डागणार, याकडे पुणे जिल्ह्यासह अख्ख्या राज्याचे लक्ष लागले आहे. (BJP leader Kirit Somaiya will arrive in Baramati tomorrow)

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या जवळचे मानले जाणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केले आहेत. तसेच, गेल्या महिन्यात ते खरमाटे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुळशीतील गेले होते. त्याबाबतचे व्हिडिओ सोमय्या यांनी ट्विट केले होते. त्याचवेळी त्यांनी खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी आपण बारामतीत येणार असल्याचे जाहीर केले होते. पण, सोमय्या उद्या नेमके कोणावर निशाणा साधणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.

 Kirit Somaiya
ठरलेलं लग्न मोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर पळून गेली

किरीट सोमय्या हे उद्या साताऱ्याहून कोरेगावमार्गे जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जाणार आहेत. ते कारखाना परिसरात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तेथून सोमय्या हे पुसेगावमार्गे डिसकळवरून फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. त्यानंतर बारामतीत सोमय्या हे दुपारी पावणेदोनच्या सुमारास येणार आहेत.

 Kirit Somaiya
मी देवेंद्रजींना विचारलंय...हमरीतुमरी किती पातळीपर्यंत करायची? : उद्धव ठाकरे

बारामतीत खरमाटे यांच्या जागांची पाहणी करुन ते येथील भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात जाऊन ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दर्शन घेऊन सव्वासात वाजता सासवड येथे थांबणार आहेत. फुरसुंगी येथे रात्री साडेआठ वाजता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

जरंडेश्वर कारखान्याला भेट आणि त्यानंतर बारामतीत सोमय्यांची पत्रकार परिषद होत असल्याने ते पवारांच्या बालेकिल्ल्यात येऊन काय बोलतात, कोणावर आरोप करतात, या बाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. बारामती येथील भाजप कार्यालयाबाहेर सोमय्यांच्या स्वागताचा फलकही कार्यकर्त्यांनी उभारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com