ठाकरे सरकारची झोप उडविणारे भाजपचे आक्रमक नेते

कोणते हे चेहरे आहेत, जे रोज आघाडी सरकारवर हल्लाबोल करुन आघाडी सरकारला (Uddhav Thackeray) कोंडीत पकडतात. हे जाणून घेऊया
 Balasaheb Thorat, Uddhav Thackeray Ajit Pawar
Balasaheb Thorat, Uddhav Thackeray Ajit Pawarsarkarnama

पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आक्रमक विरोधी पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. सरकारला सातत्याने अडचणीत आणण्यात विरोधी पक्ष कोणतीही कसर ठेवत नाही, असे म्हणणे अतिशोयक्ती ठरणार नाही. यात भाजपचे काही चेहरे आघाडीवर दिसतात. या आक्रमण चेहऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच एकही दिवस सुखाने जाणार नाही, याची खबरदारी घेतलेली दिसते. कोणते हे चेहरे आहेत, जे रोज हल्लाबोल करुन आघाडी सरकारला (Uddhav Thackeray)कोंडीत पकडतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याशिवाय हे सहा नेते आघाडी सरकारवर टीका करीत असतात, कोण आहेत हे नेते हे जाणून घेऊया

 Narayan Rane
Narayan Ranesarkarnama

१) नारायण राणे (केंद्रीय मंत्री) : आघाडी सरकारवर तुटून पडण्यात अग्रेसर असणारं पहिलं नाव म्हणजे नारायण राणे (Narayan Rane). आघाडी सरकारवर थेट टीका करुन त्यांना धारेवर धरणारे आक्रमक नेते म्हणून नारायण राणेंनी ओळख आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण किंवा दिशा सालियन मृत्यूप्रकरण, कोरोना काळात ठाकरे सरकारचे अपयश आदी विषयांवर राणे व त्याचे मुले नितेश राणे, निलेश राणे हे नेहमीच जोरदार टीका करीत असतात. शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणे हे व्यक्तिगत टीका करताना दिसतात. उद्धय ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरे राणेंनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. काही दिवसापूर्वी भाजपच्या जनयात्रेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर अशीच टीका केली. त्यानंतर झालेला राडा देशाने पाहिला.

 Kirit Somaiya
Kirit Somaiyasarkarnama

२) किरीट सोमय्या ( माजी खासदार) : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya )ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) स्थापन झाल्यापासून आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप केले. मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, खासदार भावना गवळी यांच्यावर विविध आरोप केलं. सोमय्यांनी नुसते आरोप करुन थांबले नाही, तर या नेत्यांमागे तपास यंत्रणांची चैाकशी लावली. सोमय्यांच्या पाठपुराव्यामुळे अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्या मागे ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणा लावल्या. सध्या त्यांनी हसन मुश्रीफ यांच्याकडे मोर्चा वळविला आहे.

Chitra Wagh
Chitra Waghsarkarnama

३) चित्रा वाघ (प्रदेश उपाध्यक्षा) : पुण्यातील तरुणी पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्यास चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी भाग पाडलं आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजपचा किल्ला लढवण्याची जबाबदारी चित्रा वाघ यांच्यावर देण्यात आली होती. भाजपमधील आक्रमक महिला चेहरा म्हणून चित्रा वाघ यांना ओळखलं जाते. विशेषत: महिलांच्या प्रश्नांवर त्या सरकारला नेहमीच प्रश्न विचारत असतात. पूजा चव्हाण यांच्या आत्महनंतर या विशेष चर्चेत आल्या. या प्रकरणावरुन त्यांनी माजी मंत्री संजय राठोड आणि आघाडी सरकारला कोंडीत पकडले होते संजय राठोड यांचा राजीनामा घेऊनच चित्रा वाघ या शांत बसल्या. त्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसचा युवा नेता मेहबूब शेख, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, साकीनाका बलात्काराची घटना यावरुन वाघ यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. त्यामुळे वाघ यांना सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या नेत्या म्हणून ओळखले जाते.

Gopichandra Padalkar
Gopichandra Padalkarsarkarnama

4)गोपीचंद्र पडळकर (आमदार) : पडळकर (Gopichandra Padalkar) हे नेहमीच महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आरोप करताना दिसतात. ओबीसी आरक्षण, एमपीएससी विद्यार्थी आंदोलन, बैलगाडा शर्यत या प्रश्नासाठी ते सातत्याने टीका करीत असतात. ते रस्त्यावर उतरुन आंदोलनही करताता. त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत काम करणारी समिती हरविली असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. काही दिवसापूर्वी पडळकरांनी एसटी महामंडळाच्या कारभारावरुन आघाडी सरकारवर टीका केली आहे. पवार कुटुंबियावर सातत्याने हल्लाबोल करणारे नेते म्हणून पडळकरांची ओळख आहे.

Pravin Darekar
Pravin Darekarsarkarnama

५) प्रवीण दरेकर (विरोधी पक्षनेते) : ठाकरे सरकारने एखाद्या विधानावर किंवा निर्णयावर प्रसारमाध्यमांना तात्काळ प्रतिक्रिया देणारे नेते म्हणून प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणून ओळखले जातात. सरकारच्या मुद्यांवर लक्ष वेधत ते महाविकास आघाडी सरकारवर टीका करीत असतात. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर दरेकरांनी राष्ट्रवादीवर गंभीर टीका केली होती. ''राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे,'' अशी टीका दरेकर यांनी केली. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते.

Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkarsarkarnama

६) अतुल भातखळकर (आमदार) : मुंबईतील विविध प्रश्नांवर अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)आक्रमकपणे बोलत असतात. यात लोकल, महापालिकेचा कारभार, परप्रांतियांचा प्रश्न आदी विषयांवर ते आक्रमकपणे भाजपची बाजू मांडत असतात. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भातखळकर यांची निवड भाजपने केली आहे. याशिवाय सुशांतसिंह राजपूत, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, धनजंय मुंडे-करुणा शर्मा प्रकरण, सचिन वाझे प्रकरण अशा प्रकरणावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचे काम भातखळकर करीत असतात. ''उद्धव ठाकरे हे इतिहासातील सर्वात थिल्लर मुख्यमंत्री आहेत. यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक शक्ती कपूर आहेत, अशी टीका त्यांनी नुकतीच केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com