Rahul Kul : राहुल कुल यांनी 18 कोटी देण्याचे मान्य केले अन् रियाजभाई जाळ्यात अडकला!

राहुल कुल यांना रियाजभाईने केला होता फोन.
BJP MLA Rahul Kul Latest Marathi News
BJP MLA Rahul Kul Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपच्या (BJP) आमदारांना मंत्रिपदासाठी शंभर कोटींची मागणी करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी रिजाय शेख म्हणजे रियाजभाई यानेच आमदार राहुल कुल यांच्याकडे शंभर कोटींची मागणी केली होती. त्यापैकी 18 कोटी रुपये देण्याची तयारी राहुल कुल यांनी दर्शवल्यानंतर रियाजभाई पैसे घेण्यासाठी आला होता. तिथे पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. (Rahul Kul Latest News)

राहुल कुल यांचे खासगी सचिव ओंकार बाळकृष्ण थोरात यांनी मुंबई पोलिसांत याबाबत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये घडलेला घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. कुल यांनी पैशांची मागणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सुचना केल्या आणि सापळा रचून आरोपीला अटक केली.

थोरात यांनी तक्रारीत काय म्हटलं आहे?

थोरात यांना 17 जुलै रोजी ते आकाशवाणी आमदार निवास येथे असताना दुपारी 12.12 वाजता एक फोन आला. समोरील व्यक्तीने रियाजभाई असं नाव सांगितलं. मी दिल्लीवरून आलो आहे. मला साहेबांनी मिटींगची वेळ दुपारी चार वाजता दिली आहे. आमदार कुल हे माझा फोन गेत नाहीत. त्यांची कुठे भेट होईल, असं या व्यक्तीने विचारले, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

BJP MLA Rahul Kul Latest Marathi News
राहुल कुल, गोरेंनी फसवणुकीचा डाव ओळखला अन् फडणवीसांनी उधळून लावला!

त्यावर थोरात यांनी मी आमदारसाहेबांशी बोलतो व तुम्हाला सांगितो असं रियाजभाईला सांगितले. हॉटेल ओबेरॉय येथे दुपारी साडे चार वाजता थोरात यांनी कुल यांची भेट घेतली. त्यांना रियाजभाईच्या फोनबाबत सांगितले. त्यावर कुल म्हणाले की, रिजाजभाई नावाच्या माणसाने आपल्याला 12 जुलै रोजी फोन केला होता. तो बीजेपीच्या मोठ्या लोकांच्या संपर्कात असून, महाराष्ट्र सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळण्यासाठी 100 कोटी रुपये मागत होता, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

कुल यांनी त्यावेळी थोरात यांना रियाजभाईला हॉटेलमध्ये बोलावण्यास सांगितले. त्यानुसार रियाजभाईला निरोप देण्यात आला. तो सायंकाळी सव्वा पाच वाजता कुल यांना हॉटेलमधील कॅफेटेरियामध्ये येऊन भेटला. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. त्यानंतर रियाजभाई निघून गेला. दोघांमध्ये चर्चेबाबत कुल यांनी थोरातांना सांगितले. मंत्रिपद देण्यासाठी 100 कोटी ऐवजी 90 कोटी मागत असून त्यापैकी 20 टक्के रक्कम म्हणजे 18 कोटी उद्या घेण्यासाठी येणार आहे. उर्वरित काम झाल्यानंतर देण्यास सांगितले आहे, असं कुल म्हणाल्याचे थोरातांनी तक्रारीत म्हटलं आहे.

दि. 18 जुलै रोजी दुपारी 1.15 वाजता कुल यांच्या सांगण्यावरून थोरात यांनी रियाजभाईला पोन करून त्यांना एलआयसी बिल्डींग, नरिमन पॉईंट याठिकाणी येण्यास सांगितले. तो तिथे आल्यानंतर थोरात त्याला कुल यांच्याकडे घेऊन गेले. त्यानंतर तो कुल यांच्यासोबत ओबेरॉय हॉटेलमध्ये पैसे घेण्यासाठी आला. त्यानंतर कुल आणि आमदार जयकुमार गोरे हे रियाजभाई याच्यासोबत कॅफिटेरियामध्ये बसले. त्यावेळी थोरात हे त्यांच्याबाजूलाच होते. त्यानंतर काही वेळात साध्या वेशातील पोलीस हॉटेलमध्ये आले व त्यांनी रियाजभाईला ताब्यात घेतल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com