"भाऊ, तुमच्यामुळे मी परत खासदार झालो ! ; महाडीकांनी मानले जगतापांचे आभार

लक्ष्मणभाऊंमुळे दुसऱ्यांदा खासदार होण्याचा माझा मार्ग सुकर झाला, अशी प्रांजळ भावना महाडीक यांनी या भेटीत दिली.
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadiksarkarnama

पिंपरी : राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रतिष्ठेची केलेली सहावी जागा जिंकून भाजपने महाविकास आघाडीला काल धक्का दिला.संख्याबळानुसार निवडून येऊ न शकणारी ही जागा त्यांनी निवडून आणली.

कोल्हापूरचे धनजंय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले. त्यासाठी जीवघेण्या आजाराशी सामना करीत असलेले चिंचवडचे पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि कसबापेठच्या आमदार मुक्ता टिळक या दोघांनीही रुग्णवाहिकेतून मुंबईतला जाऊन मतदान केले होते. म्हणून हा विजय या दोन आमदारांना राज्यातील भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच समर्पित केला. त्यानंतर लगेच काल रात्रीच नवनिर्वाचित खासदार महाडिकांनी आमदार जगतापांच्या पिंपरी-चिंचवडमधील (पिंपळे गुरव) निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार मानले.

लक्ष्मणभाऊंमुळे दुसऱ्यांदा खासदार होण्याचा माझा मार्ग सुकर झाला, अशी प्रांजळ भावना महाडीक यांनी या भेटीत दिली. “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारी आहे”, अशा शब्दांत त्यांनी जगतापांचे आभार मानले.

"तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, पिंपरी-चिंचवडमधील जनतेच्या सेवेसाठी तुम्ही लवकरात लवकर पुन्हा नव्या जोमाने काम सुरू कराल," अशी प्रार्थना त्यांनी केली. पिंपरी-चिंचवड पालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी सर्व प्रकारची मदत मी करणार असल्याचा शब्द महाडीक यांनी यावेळी जगताप यांना दिला. जगतापांचे बंधू, माजी नगरसेवक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

मुंबईत विजयाचा जल्लोष केल्यानंतर महाडीक शनिवारी रात्री थेट पिंपळेगुरवमध्ये आले. त्यांनी जगतापांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे जगताप कुटुंबियांच्या वतीने औक्षण करून अभिनंदन करण्यात आले.

Dhananjay Mahadik
राऊत हे महाभारतातील संजय आहेत का ? ; श्यामसुंदर शिंदे संतप्त

विधानसभेतील आमदारांमधून राज्यसेभेवर निवडून द्यावयाच्या ६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. निवडणूक रिंगणात ७ उमेदवार उतरल्याने चुरस होती. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडीक यांच्यात सहाव्या जागेसाठी लढाई झाली. त्यात भाजपचे धनंजय महाडीक विजयी झाले.

Dhananjay Mahadik
rajya sabha election result : राष्ट्रवादीनं शिवसेनेवर फोडलं पराभवाचं खापर

पक्षाने या विजयाचे संपूर्ण श्रेय आमदार जगतापांना दिले. ते गेले दोन महिने आजारी आहेत. त्यांना नुकतेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. अजूनही त्यांना तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. मात्र, राज्यसभा निव़़डणुकीसाठी पक्षाला एका-एका मताची असलेली गरज ओळखून त्यांनी घर ते मुंबई असा ऍम्ब्युलन्समधून प्रवास करत या निवडणुकीत मतदान केले. त्यांची ही पक्षनिष्ठा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून फडणवीस आणि राज्यातील संपूर्ण भाजप भारावून गेली. कारण त्यांच्या मतदानामुळे महाडीकांचा विजय सोपा झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com