जगतापांच्या डावपेचाने राष्ट्रवादीसमोर आव्हान; पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Pimpri-Chinchwad News : भाजपचे नेते शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला
Pimpri-Chinchwad Bjp News
Pimpri-Chinchwad Bjp NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : राज्यात येत्या जानेवारी महिन्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुक होण्याची ताजी चर्चा आहे. मात्र, ती होणार नाही अशी खात्री भाजपला वाटते आहे. म्हणून ती महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. राज्यातील महापालिकांची टर्म संपल्याने पालिका निवडणुकच प्रथम होईल, असे अनुमान काढत पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) भाजप (BJP) या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.

२०१७ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसची (NCP) १५ वर्षाची सत्ता उलथवून भाजप प्रथमच पिंपरी महापालिकेत सत्तेत आली. त्यावेळी १२८ पैकी त्यांचे ७७ नगरसेवक निवडून आले होते. यावर्षी १३ मार्च रोजी पालिकेची मुदत संपली. त्यामुळे लगेच ही निवडणूक होईल, असे गृहित धरलेल्या भाजपने २०२२ ला शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची घोषणा केली होती.

Pimpri-Chinchwad Bjp News
Rohit Pawar : पवार म्हणाले, 'शिंदे सरकारचं आता अती होतयं, हा रडीचा डाव..'

मात्र, पालिकेत प्रशासक नेमले गेले. गेले आठ महिने त्यांचा कारभार सुरु आहे. मात्र, आता पालिका निवडणुकीला अडसर ठरणारा ओबीसी आरक्षणाचा निर्णायक अडथळा दूर झाल्याने ही निवडणूक आता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप तिच्या तयारीला पिंपरीत लागली आहे.

गतवेळी शहरातील तीनपैकी चिंचवड या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. या मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख आणि चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे बंधू शंकर जगताप यांनी काल पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. मतदान केंद्रावरील बुथ सक्षमीकरण, प्रत्येक बुथवर पक्ष कार्यकर्त्यांच्या नेमणुकीचा त्यांनी माहिती घेतली. पक्षाच्या बांधणीसाठी मार्गदर्शन केले.

Pimpri-Chinchwad Bjp News
NCP : आव्हाडांवरील गुन्ह्याबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ; महिला लोकप्रतिनिधी आक्रमक

पक्षाचे काम, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी चिंचवड-किवळे मंडलातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना यावेळी केले. यापूर्वी ज्या बुथवर कमी मते मिळाली आहेत, तिथे प्राधान्याने सक्षमीकरण करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पक्षाचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे तसेच मधुकर बच्चे आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com