Pimpri-Chinchwad News : आगामी लोकसभेला महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांचे खासदार असलेले मतदारसंघ आपल्या रडारवर घेतले असून, त्यात शिरूर (जि. पुणे) मतदारसंघाचा समावेश आहे. तेथे त्यांनी लोकसभेबरोबर विधानसभेचीही जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून शिरूरचे त्यांचे निवडणूक प्रचार प्रमुख आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयात प्रमुखांची शनिवारी (ता.३०) बैठक घेतली.
शिरूरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आहेत. त्यांना तेथून पुन्हा तयारी करण्यास शरद पवारांनी अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे ते कामाला लागले आहेत. शरद पवारांनीही या मतदारसंघात जातीने लक्ष घालणे सुरू केले आहे. कारण पक्षफुटीनंतर अजित पवारांची साथ दिलेले शिरूरमधील खेड आणि आंबेगावचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
त्यासाठी ते उद्या शिरूरच्या म्हणजे उत्तर पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यापूर्वीच भाजपने (BJP) आपल्या जिल्हा कार्यालयात (भाम, ता. खेड) बैठक घेतली. तेथील उमेदवार म्हणून आताच चर्चा सुरू असलेल्या लांडगेंनी ती घेतली. उत्तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे- पाटील अध्यक्षस्थानी होते.
लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत शिरूर लोकसभेत भाजपचे नेत्यांचे दौरे होणार आहेत. राज्याचे मंत्रीदेखील ते करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे 12 ऑक्टोबर रोजी दिवसभर या मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर-हवेली, भोसरी, हडपसर या सहाही विधानसभेत तो करणार आहेत. त्यात ते प्रत्येक विधानसभेतील प्रमुख 100 अशा 600 कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडक शंभर कार्यकर्त्यांना प्रत्येकी तीन बूथची जबाबदारी दिली जाणार आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या नियोजनाची ही बैठक होती. लोकसभा, विधानसभेच्या दृष्टीने तयारी आणि बूथ सशक्तीकरणावरही या वेळी चर्चा झाली. तसेच लोकसभा तयारीच्या कामाला गती मिळावी म्हणून प्रत्येक विधानसभेसाठी प्रभारींच्या नेमणुका या वेळी करण्यात आल्या. जुन्नरला राम गावडे, आंबेगावसाठी शिवाजीराव भुजबळ, खेडला भगवान घोलप, शिरूर-हवेलीकरिता जयसिंग एरंडे, तर भोसरीसाठी दादासाहेब सातव यांना प्रभारी करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार योगेशअण्णा टिळेकर (हडपसर), जयश्री पलांडे ( आंबेगाव), अतुल देशमुख (खेड-आळंदी), विकास डोळस ( भोसरी), जिल्ह्याचे सरचिटणीस संजय रौंधळ, महिला मोर्चा अध्यक्ष पूनम चौधरी, लोकसभा संयोजक, धर्मेंद्र खांडरे, प्रदेश प्रतिनिधी राम गावडे, विधानसभा संयोजक सचिन लांडगे (खेड) संदीप भोंडवे (शिरूर हवेली) संजय थोरात (आंबेगाव), विजय फुगे (भोसरी), संदीप दळवी ( हडपसर) तालुकाध्यक्ष संतोष खैरे (जुन्नर) संदीप बाणखेले (आंबेगाव), शांताराम भोसले (खेड), शाम गावडे (हवेली), प्रदीप सोनवणे ( शिरूर) मारुती शेळके ( शिरूर बेट) आदी या बैठकीला उपस्थित होते.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.