राजकारण पेटलं : सोमय्या ज्या पायरीवर पडले तिथेच भाजप त्यांचा जाहीर सत्कार करणार!

भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) येत्या शुक्रवारी (ता.11) पुण्यात येणार आहेत.
Kirit Somaiya in PMC
Kirit Somaiya in PMC Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पुणे महापालिकेत (PMC) शिवसैनिकांशी झटापट झाली होती. यावरून भाजप विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा वाद पेटला आहे. आता या प्रकरणात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमय्यांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पुण्यातील भाजप पदाधिकारी यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. याचबरोबर सोमय्या ज्या पायरीवर पडले तिथेच त्यांचा जाहीर सत्कार करण्याची घोषणा भाजपने केली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस आयुक्त गुप्तांची भेट घेतली. सोमय्यांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली. पुण्यात सोमय्या यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. तो पूर्व नियोजित कट होता. भाजपने तक्रार देऊनही गांभीर्य न घेता हल्लेखोरांवर साधे कलम लावण्यात आले. त्यामुळे हल्लेखोर मोकळे सुटले आहेत. अशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई केल्यास शहरात जंगलराज होऊ शकते, असे शिष्टमंडळाने आयुक्तांना सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव आणत आहे. सरकारला राज्यात हिंसाचार वाढवून राज्य करायचे आहे. पोलिसांनी लावलेली कलमे योग्य नाहीत, त्यात वाढ करावी. हल्लेखोरांवर योग्य कारवाई करावी, अशी भाजपची मागणी आहे, असेही शिष्टमंडळाने नमूद केले. दरम्यान, किरीट सोमय्या येत्या शुक्रवारी (ता.11) पुण्यात येणार आहेत. त्यांना महापालिकेच्या ज्या पायरीवर धक्काबुक्की झाली तिथेच त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे, अशी घोषणा शहराध्यक्ष मुळीक यांनी केली.

Kirit Somaiya in PMC
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात भगवा झेंडा फडकावला? : ही आहे वस्तुस्थिती

सोमय्या हे 5 फेब्रवारीला महापालिकेत आले असतानाता शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मात्र आक्रमक शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या अक्षरश: महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले. किरीट सोमय्याच्या सुरक्षारक्षकांनी शिवसैनिकांना बाजूला करत त्यांना बाहेर काढले. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.

Kirit Somaiya in PMC
आमदार नितेश राणेंची प्रकृती आणखी खालावली; 'आयसीयू'मध्ये हलवलं

या झटापटीत जखमी झालेल्या सोमय्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 6 फेब्रुवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. नंतर हाताला बँडेज लावलेल्या अवस्थेत व्हीलचेअरवरून सोमय्या रुग्णालयातून थेट पुणे महापालिकेत पोचले होते. आधीचा प्रकार लक्षात घेता सोमय्यांच्या झेड सुरक्षेसोबत मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. सोमय्यांनी जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहाराची तक्रार करुन लगेच ते तिथून निघून गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com