महिलांच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे; आशा बुचकेंचा दारूण पराभव

पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत दोन माजी अध्यक्षांचा पराभव; आठ नव्या चेहऱ्यांची एन्ट्री
Asha Buchke

Asha Buchke

sarkarnama

Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने (ncp) सलग पाचव्यांदा एकहाती सत्ता मिळविली आहे. या बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १६ जागांवर बाजी मारत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा या बॅंकेवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. या निवडणुकीत महिला प्रवर्गातील दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. शिवसेनेतून भाजपत (bjp) गेलेल्या जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके (Asha Buchke) प्रथमच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. (BJP's Asha Buchke defeated in pune District Bank elections)

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने चार दशकांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच एका जागेवर विजय मिळवत, संचालक मंडळात खाते उघडले आहे. भाजपचे प्रदीप कंद हे क वर्ग मतदारसंघातून विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे तीन मंत्री, संग्राम थोपटे, संजय जगताप, दिलीप मोहिते हे तीन आमदार आणि बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह ११ संचालक या बॅंकेवर पुन्हा एकदा निवडून गेले आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह आठ जण यंदा पहिल्यांदाच या बॅंकेचे संचालक झाले आहेत. अन्य दोघे हे काही कार्यकाळाच्या खंडानंतर पुन्हा एकदा संचालक झाले आहेत.

Asha Buchke

अशोक पवारांनी धोका ओळखून फिल्डिंग लावली; पण कंदांनी विजयाची संधी साधलीच!

जिल्हा बॅंकेच्या २०२१ ते २०२६ या कार्यकाळासाठीच्या संचालक निवडीसाठी २९ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत १४ जण बिनविरोध झाले होते. उर्वरित सात जागांसाठी २ जानेवारीला मतदान झाले. याची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी याआधी बिनविरोध झालेल्या सर्वांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली आणि निवडणुकीत विजयी उमेदवार जाहीर केले.

Asha Buchke

‘साथ कुणी दिली...ऽ बारामती...ऽऽ’ : कार्यकर्त्यांच्या या घोषणेबाबत कंद म्हणाले...

आठ नवे चेहरे

यंदा पहिल्यांदाच जिल्हा बॅंकेवर निवडून गेलेल्यांमध्ये अशोक पवार, प्रदिप कंद, विकास दांगट, संभाजी होळकर, सुनील चांदेरे, प्रवीण शिंदे, निर्मला जागडे आणि पूजा बुट्टे पाटील यांचा समावेश आहे. दत्तात्रेय येळे आणि ज्ञानोबा दाभाडे हे दोघे जण एक किंवा दोन कार्यकाळाच्या खंडानंतर पुन्हा एकदा संचालक झाले आहेत. या निवडणुकीत बॅंकेचे मावळते संचालक प्रकाश म्हस्के (हवेली), आत्माराम कलाटे (मुळशी) या दोन माजी अध्यक्षांसह सुरेश घुले (हवेली) या तीन संचालकांना पराभव पत्करावा लागला आहे. निवडणूक झालेल्या सात जागांपैकी सहा जागांवर मतदारांनी ज्येष्ठांना नाकारले असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Asha Buchke

आत्माराम कलाटेंची २२ वर्षांची बॅंकेतील सत्ता नवख्या चांदेरेंनी संपवली!

प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव

या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहकार पॅनेल रिंगणात उतरविले होते. या पॅनेलमध्ये हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात अधिकृत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच विकास दांगट अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. शिरूरमधून सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार, मुळशीतून सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी बॅंकेचे विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांचा पराभव केला आहे.

Asha Buchke

निर्मला जागडेंच्या विजयाने वेल्ह्याला तब्बल २५ वर्षांनंतर मिळाले दोन संचालक!

मी कोणा एका पक्षाचा नाही : जगदाळे

एकूण जागांपैकी १३ जागा अ वर्ग तालुका मतदारसंघ, दोन जागा महिला राखीव, ब, क व ड मतदारसंघ प्रत्येकी एक, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि भटक्या जाती, विमुक्त जमाती प्रत्येकी एक अशा एकूण २१ जागांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क वर्ग मतदारसंघ आणि मुळशी तालुका अ वर्ग मतदारसंघ निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केली होती. यापैकी मुळशीची जागा जिंकण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकार पॅनेलला यश आले आहे. माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे हे ड वर्ग मतदारसंघातून आणि निर्मला जागडे व पूजा बुट्टे पाटील या महिला राखीव मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. सर्व पक्षांच्या सहकार्यामुळे मी जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडून गेलो आहे. त्यामुळे मी कोणा एका पक्षाचा उमेदवार म्हणता येणार नाही, असे इंदापूर तालुका अ वर्ग मतदारसंघातून बिनविरोध झालेले अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले.

Asha Buchke

राजकीय हिशेब चुकते करण्यास एकत्र आलेल्या विरोधकांना पवारांनी दाखवला कात्रजचा घाट!

रमेश थोरात सर्वात ज्येष्ठ; तर बुट्टे तरुण संचालक!

जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात हे सलग आठव्यांदा बॅंकेवर निवडून गेले आहेत. ते १९८२ पासून बॅंकेवर सलग निवडून येत आहेत. सध्या त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. वय आणि अनुभव या दोन्ही बाबतीत रमेश थोरात हे जिल्हा बॅंकेचे सर्वात ज्येष्ठ संचालक ठरले आहेत. दरम्यान महिलांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेल्या पूजा बुट्टे पाटील या सर्वात तरुण संचालक ठरल्या आहेत. अगदी वयाच्या चाळिशीत त्यांना संचालकपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com