Dheeraj Ghate News : भाजपच्या धीरज घाटेंचा मतमोजणीसाठी 'है तैयार हम'चा नारा

Pune Bjp President Claims win of Murlidhar Mohol : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच शनिवारी भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मतमोजणीसंदर्भातील सूचना देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचा दरबार भरवला होता.
Dheeraj Ghate
Dheeraj GhateSarkarnama

Pune Loksabha Election : पुण्यात शंभर नगरसेवक, अर्धा डझन आमदार, एक खासदार असलेल्या भाजपला BJP या लोकसभा निवडणुकीत मात्र, 'लीड'साठी नव्हे; तर चक्क विजयासाठी झगडावे लागत असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस म्हणून नव्हे तर आमदार रवींद्र धंगेकरांच्या Ravindra Dhangekar झंझावातामुळे भरवश्याच्या पुण्यासारख्या मतदारसंघात भाजप नेत्यांना प्रचाराची व्याप्ती वाढावी लागली.

निवडणूक जिंकण्यासाठी ताकद लावलेल्या भाजप नेत्यांनी आता मतमोजणीसाठी खास 'प्लॅनिंग केले आहे. त्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंनी (Dheeraj Ghate) विशेष दरबार भरवून 'है तैयार हम' असे दाखवून दिले.

Dheeraj Ghate
Vidhan Parishad Election News : लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक टांगणीला; 'हे' आहे कारण

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच शनिवारी भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी मतमोजणीसंदर्भातील सूचना देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचा दरबार भरवला होता. येत्या मंगळवारी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या (Bjp) पुण्यातील सर्व मंडल अध्यक्षांची पूर्व नियोजनात्मक बैठक शहर कार्यालयात पार पडली. मतमोजणीच्या दिवशी पदाधिकारी व मंडल अध्यक्षांनी काय करणे आवश्यक आहे, या संदर्भातील सूचना यावेळी त्यांना देण्यात आल्या.

त्यासोबतच मतमोजणीवेळी काय अडचणी येतात, त्यावर सरकारी नियमानुसार काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे मतमोजणीवेळी काही अडचण आली तर लगेचच काय करता येईल, याबाबत बैठकीत सविस्तर मार्गदर्शन पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले.

त्यासोबतच भाजपच्या प्रवक्त्यांना पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस पक्षाचे पदाधिकारी व मंडल अध्यक्ष उपस्थित होते. पुणे लोकसभा मतदारसंघात 51 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. 2019 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेस व भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावून विजयासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अन् भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विजयाचा दावा केला जात असला तरी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

Dheeraj Ghate
Pune BJP News : 'कसबा ते कोथरूड'; पुणे भाजपचे बदलते सत्ताकेंद्र...'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com