Kasba By-Election : कसबा जिंकण्यासाठी भाजपचे 'संकटमोचक' मैदानात; आघाडीला घेरण्याचा 'मास्टरप्लान' ठरला?

Girish Mahajan : चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेस वीस तर भाजप चाळीस स्टार प्रचारकांची फौज उतरवणार...
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

Pune News : आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुका भाजप आणि महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेची केली आहे. भाजप आणि आघाडीनं या निवडणुकांमधील विजयासाठी कंबर कसली असून आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची फौज दाखल होत आहे.आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत वातावरण निर्मिती केल्यानंतर आता भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहे.

Girish Mahajan
Anil Deshmukh : बावनकुळेंना माझ्या बोलण्याचा संदर्भच समजलेला नाही, म्हणून...

भाजपकडून कसबा पोटनिवडणुकसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत रासने विरुद्ध धंगेकर अशी थेट लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांमागे त्यांच्या पक्षांनी पूर्ण ताकद लावली आहे.

Girish Mahajan
Jalgaon News; ‘खोका’ तर गुन्हेगारांचा शब्द, उच्चशिक्षित म्हणतात ‘फाइल’!

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारामुळे आरोप प्रत्यारोपांनी राजकारण तापलेलं असतानाच मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांनी भाजप कोअर कमिटीची गुप्त बैठक घेतली आहे. या बैठकीला आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना विजयाचा कानमंत्र देतानाच निवडणुकीतील प्रचार, मतदान, भेटीगाठी, बैठका, मतांची जुळवाजुळव, विरोधकांना घेरण्यासाठीची रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे.

'या' दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार...

चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेस वीस ,तर भाजप त्याच्या दुप्पट म्हणजे चाळीस स्टार प्रचारकांची फौज उतरवणार आहे. नितीन गडकरी,नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड या चार केंद्रीय मंत्री असणार आहेत.

याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चित्रा वाघ तसेच पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले,प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, यांसारख्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com