Pune By Election : कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी,संजय काकडेंनी थेट फडणवीसांना पाठवला मेसेज; म्हणाले...

Kasba By Election : पराभवाची नैतिक जबाबदारी माझी देखील...
sanjay kakade
sanjay kakade

Sanjay Kakde News : भाजपाचा वर्षानुवर्ष बालेकिल्ला राहिलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. यावेळी महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने यांच्यावर तब्बल ११ हजार मतांनी मात केली.यानंतर विरोधकांकडून भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान, आता भाजपच्या नेतेमंडळींकडूनही कसबा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यात येत आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध नेतेमंडळींनी कसबा पोटनिवडणुकीतील पराभवावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यानंतर आता माजी राज्यसभा खासदार व भाजप नेते संजय काकडे(Sanjay Kakade) यांनीही कसब्यातील पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांना मेसेज केला आहे. या मेसेजमध्ये काकडे यांनी फडणवीसांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

sanjay kakade
Pune By Election Result : निवडणुकीच्या निकालातून मतदारांनीच भाजपच्या सत्तेची मस्ती उतरवली; पटोलेंचा हल्लाबोल

काकडे म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीनंतर भाजपला नक्कीच आत्मचिंतन कराव लागेल.तसेच जो पराभव घडलेला आहे त्या पराभवाची नैतिक जबाबदारी माझी देखील आहे. त्यामुळेच मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना मेसेज करून दिलगिरी व्यक्त करून जी काही कारवाई करायची असेल ती माझ्यावर करू शकता अशा प्रकारचा संदेश फडणवीसांना पाठविला आहे.

चंद्रकांत पाटलांचं टि्वट

भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीतील पराभवावर टि्वटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू! असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.

जनशक्तीनं महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला!

कसब्यातील विजयावर भाष्य करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. तब्बल २८ वर्षांनंतर या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com