Niranjan Davkhare Vs Abhijit Panse: मनसेशी फिसकटलं? भाजपच्या डावखरेंचं ठरलं, अभिजीत पानसेंविरोधात' या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार

Niranjan Davkhare candidate for Legislative Council : आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी भूमिका अभिजित पानसे यांनी जाहीर केल्यानंतर डावखरेंच्या उमेदवारीबाबत भाजपची नेमकी भूमिका काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
Niranjan Davkhare Vs Abhijit Panse
Niranjan Davkhare Vs Abhijit PanseSarkarnama

Niranjan Davkhare, 1 June: सलग तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी भूमिका मनसेच्या (MNS) अभिजित पानसे यांनी जाहीर केल्यामुळे डावखरे नेमका कोणता डाव खेळणार आणि डावखरेंच्या उमेदवारीबाबत भाजपची नेमकी भूमिका काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

शिवाय भाजप हा मतदारसंघ मनसेसाठी सोडणार का? असा प्रश्नही उपस्थित झाला होता. मात्र या सर्वच प्रश्नांना खुद्द डावखरे यांनी पूर्णविराम दिला आहे. कारण 7 तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं डावखरे यांनी सरकारनामाशी बोलताना जाहीर केलं आहे.

2012 पासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे प्रतिनिधीत्व करणारे निरंजन डावखरे यांनी 2012 ची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविली तर सन 2018 मध्ये भाजपकडून. 2018 मध्ये आमदार झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ते विशेष मर्जीतील राहिले आहेत. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची फडणवीस यांची जनयात्रा, यंदाची पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभांच्या नियोजनाचे प्रमुख म्हणून डावखरेंवर जबाबदारी दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसंच ठाणे ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्षपद, भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषदेत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्याची जबाबदारीही त्यांचेवर आहे. त्यामुळे डावखरे यांची सन 2024-30 साठी याच मतदारसंघातील महायुती म्हणजेच भाजपकडून उमेदवारी निश्चित समजली जात होती. मात्र, लोकसभा 2024 निवडणूकीपूर्वी महायुतीत सामील झालेल्या मनसेने अचानक या मतदारसंघातून अभिजित पानसेंनी उमेदवारीची घोषणा केल्यामुळे आता हा ही जागा भाजला जाणार की मनसेला असा प्रश्न उपस्थित झाला होता.

या चर्चांनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड.अशिष शेलार (Ashish Shelar) यांनी थेट राज ठाकरेंची भेट घेऊन या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या चर्तेतून काही तोडगा निघाला की नाही? याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर मनसेकडून अर्ज भरण्याची तयारी सुरू असतानाच आज डावखरे यांनी भाजपकडून आपण सात तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Niranjan Davkhare Vs Abhijit Panse
Nashik Teacher Constituency : 'तालीम' सुधीर तांबेंची, आमदारकीसाठी 'डाव' टाकलाय विवेक कोल्हेंनी!

तर मागील 12 वर्षे कोकण पदवीधर मतदारसंघात विजयी होत राहिलेले आमदार निरंजन डावखरे यांच्यासाठी हा मतदार संघ हक्काचा समजला जातो. त्यामुळे 2012 मध्ये राष्ट्रवादीकडून आणि लगेच सन 2018 मध्ये भाजपकडून त्यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यामुळे या मतदारसंघात विजय मिळवण्याचे त्यांचे कसब सर्वांना दिसले. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून आणि महायुतीकडून निरंजन डावखरेंची उमेदवारी निश्चित समजली जात होती त्याचाच प्रत्यय त्यांनी उमेदवारी घोषित केल्याने आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com