आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यामागे सध्या `साडेसाती`

नगरसेवक तुषार कामठे यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) व लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती.
Laxman Jagtap and Mahesh Landge
Laxman Jagtap and Mahesh Landgesarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे कारभारी असलेले आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यामागे सध्या एकामागोमार राजकीय संकटे येत आहेत. महापालिकेच्या स्थायी समितिचा अध्यक्ष लाचखोरीत सापडण्याचे प्रकरण मिटण्याच्या आधीच दुसरे उभे ठाकत आहेत.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेत या दोन आमदारांवर हल्लाबोल केला. त्यांच्या टिकेची चर्चा सुरू असतानाच दुसरे संकट उभे राहिले. त्यांच्याविरोधात स्वपक्षातील नगरसेवकाने तक्रारींचा पाढा वाचत गंभीर आरोप केले.

Laxman Jagtap and Mahesh Landge
''भ्रष्टाचार न करता पिंपरी-चिंचवडमध्ये केलेली दहा जनहिताची कामे दाखवाच''

या दोघांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या महापालिका निवडणूकीत भाजपाला त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे, असा घरचा आहेर भाजपचेच नगरसेवक तुषार कामठे यांनी सोमवारी (ता.१८ ऑक्टोबर) दिला होता. त्यावरून रान पेटले आहे. भाजपने यावरून सावरासावर करण्यास सुरवात केली असली तरी त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

एवढेच नाही, तर या दोन्ही आमदारांनी गैरव्यवहार केले असून मनमानी, हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत ते हस्तक्षेप करीत असल्याचा लेटरबॉम्ब त्यांनी टाकला होता. त्याचे पडसाद लगेचच उमटले आहेत. अशा पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि ती करणाऱ्यांची प्रसंगी हकालपट्टी करण्यात येतील, असा सज्जड इशारा शहर भाजपने आज (ता.१९ ऑक्टोबर) दिला आहे.

Laxman Jagtap and Mahesh Landge
''भ्रष्टाचार न करता पिंपरी-चिंचवडमध्ये केलेली दहा जनहिताची कामे दाखवाच''

भाजपा शिस्तप्रिय पक्ष आहे असे सांगत येथे पक्षविरोधी कारवायांना थारा नाही, असा इशारा देत, आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक पक्ष बहुमताने जिंकणार असल्याचा विश्वासही मुख्य शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष यांना लाचखोरीत अटक झाली. त्यास दोन महिने होऊनही त्यांच्याविरुद्ध पक्षाने अद्यापही कसलीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे पत्राव्दारे गऱ्हाणे मांडणाऱ्या कामठे यांच्याविरुद्धही आणि ती सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर कारवाई होण्याची शक्यता दिसत नाही.

Laxman Jagtap and Mahesh Landge
पिंपरी-चिंचवडचा सेनापती कोण असणार? : खुद्द पवारांनी सांगितली दोनच नावे

भाजपामधील काही नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाविरोधात वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. त्यावर ते महत्त्वाच्या पदांसाठी अडवणूक करून पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे थोरात यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कामठे यांनी थेट फडणवीस आणि शहा यांनाच मेल करून काल (ता.19 ऑक्टोबर) लेटरबॉम्ब टाकला. त्यामुळे तातडीने दखल घेतली गेली. पदांचा लाभ मिळवण्यासाठी पक्षाची बदनामी सहन केली जणार नाही. प्रसंगी हेकेखोरांची हकालपट्टी करण्यात येईल. पक्षाविरोधात निराधार वक्तव्य करणाऱ्यांची पर्वा राज्यातील पक्षश्रेष्ठी करणार नाहीत. कोणी पक्षाला आणि नेत्यांना आव्हान देवून वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आज देण्यात आला.

Laxman Jagtap and Mahesh Landge
निविदांतील तज्ज्ञ लाचखोरीत निलंबित; पिंपरी स्थायीची कोटीची उड्डाणे थांबली

दुसरीकडे पुन्हा एकहाती पक्षाचीच सत्ता येणार असल्याचे सांगत पक्ष म्हणून सर्वांनी एकोप्याने काम करणे अपेक्षीत आहे, असा नाराज नगरसेवकांना गोंजारण्याचा प्रयत्नही शहर भाजपने केला.

भाजपामधील काहीजणांना महत्त्वाच्या पदांचा लाभ न मिळाल्याने ते अस्वस्थ होऊन एकनिष्ठ असल्याचा दावा करीत आहेत. असे आपल्या निवेदनात म्हणणाऱ्या भाजपच्या शहर प्रवक्त्यांचा रोख हा कामठेंच्याच दिशेने होता. निष्ठावंत म्हणून प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्यांनी आपली निष्ठा तपासावी. निष्ठावंत पक्षाची कधीच बदनामी करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. त्याचवेळी पक्षशिस्त महत्त्वाची असून सर्वांनी पक्ष आणि संघटन वाढवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com