पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या समायोजन बदल्यांना लागणार ब्रेक

बदल्या स्थगित करण्याचे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिले आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

सोमेश्वरनगर : पुणे महानगरपालिका (PMC) व बारामती नगरपरिषद हद्दवाढीमुळे शहरात समाविष्ट झालेल्या ३८ गावांतील ५८६ शिक्षकांच्या समायोजन बदल्या स्थगित करण्याचे आश्वासन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे (Balasaheb Marne) यांनी दिली.

Hasan Mushrif
सेना-भाजप युतीची भाषा करणाऱ्या सत्तारांनी करून दाखवले; औरंगाबादमध्ये फडकवला युतीचा झेंडा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक नेते संभाजीराव थोरात (Sambhaji Thorat) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमधील कागल येथील निवासस्थानी मुश्रीफांची भेट घेण्यात आली. पुणे महानगरपालिका व नगरपालिका हद्दवाढ झाल्याने जिल्हा परिषद हद्दीतील 38 गावे शहरी हद्दीत गेली. सोबत प्राथमिक शाळाही समाविष्ट झाल्या. मात्र, त्या गावातील ५८६ शिक्षकांचे शाळांसह वर्गीकरण झाले नाही. यासाठी २५ जुलै २०१९ च्या फडणवीस सरकारच्या शासन निर्णयाने शिक्षक वर्ग करण्यात प्रतिबंध केला होता. दरम्यान, जिल्हा परिषदेने या शिक्षकांच्या सोमवारी (ता.१७ जानेवारी) ग्रामीण शाळांवर समायोजन बदल्या आयोजित केल्या होत्या. शैक्षणिक वर्ष सुरू असताना सुरू केलेल्या या अवकाळी बदल्यांवर शिक्षकांनी बहिष्कार घातला होता. यामुळे 25 जुलैच्या आदेशात दुरुस्ती करण्यात यावी व तोपर्यंत पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली समायोजन प्रक्रिया तातडीने स्थगित करण्यासाठी जिल्हा परिषदेला लेखी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. त्यांनी बदल्या स्थगित करण्याचे आश्वासन दिले आहे.

Hasan Mushrif
राजभवनाच्या मुख्य दारात थांबा, असं राऊत विरोधकांना का म्हणाले..

आगामी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. बदली प्रक्रिया गतिमान करून विस्थापित शिक्षकांना न्याय दिला जाईल, आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी शिक्षक संघासोबत स्वतंत्र बैठक बोलावून संघाच्या शिफारशी स्वीकारण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली. यामुळे ५८६ शिक्षकांना आणि 25 हजार मुलांना दिलासा मिळाला आहे.

Hasan Mushrif
"अजितदादा म्हणतात लसीची सक्ती; राजेश टोपेंनी सांगितले घेण्यास भाग पाडू"

दरम्यान, बदली प्रक्रिया गतिमान करणे व आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्य सरकार व शिक्षक संघाची संयुक्त बैठक होणार असून या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी मुश्रीफ यांनी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास २७ जानेवारी रोजी मुंबई येथे बोलावल्याची माहिती मारणे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com