By- Election Campaign : पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात; शिंदे उतरणार कसब्याच्या मैदानात

Pune Politics : युती आणि आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Pune News : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या पोटनिवडणुकीत युती आणि आघाडीचे दिग्गज नेते ठाण मांडून असल्यामुळे या पोटनिवडणुकीत चुरस वाढली आहे. तसेच युती आणि आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार सभाही घेतल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दोन-तीन वेळा या मतदारसंघातून दौरे करून गेले आहेत.

Eknath Shinde
Supreme Court hearing : 38 आमदार पक्षाचे धोरण ठरवू शकत नाहीत; पक्षाशिवाय त्यांचे अस्तित्व काय? सिब्बलांचा युक्तीवाद

आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून यासाठी कसबा मतदारसंघात येत्या २४ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार फेरी करणार आहेत. भाजपच्या उमेदवारासाठी शिंदे उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.

Eknath Shinde
Chinchwad By- Election : चर्चा तर होणारच...! अश्विनी जगतापांसाठी मुलींसह संपूर्ण कुटुंब मैदानात

नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यावर ही परिस्थिती येण्याला संजय राऊत हेच जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Eknath Shinde
High Court News : `त्या` ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने राजीनामा दिला अन् घेतली न्यायालयात धाव..

दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीनंतर पुण्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे मोठे विधान केले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटात हा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत नरेश म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com