पुणे : भाजपचे (BJP) प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांच्या अंगलटी आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौघांविरोधात खडक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आप्पा जाधव, गणेश नलावडे, रोहन पायगुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून चौकशीनंतर आणखी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. (BJP Vs NCP latest News)
याबाबत अधिक माहिती अशी की, आंबेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर १३ मे रोजी टिका करणारी एक कविता मोबाईलवर टाकली होती. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांनी आंबेकर यांना फोन करून संबंधित कविता योग्य नसल्याचे सांगितले, त्यावर आंबेकर यांनी त्यांची चूक झाल्याचे मान्य करून माफी मागितली होती.
दरम्यान, आंबेकर हे शनिवारी दुपारी पावणे ३ वाजता शुक्रवार पेठेतील कार्यालयात होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आप्पा जाधव, गणेश नलावडे व रोहन पायगुडे यांच्यासह आणखी काहीजण त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी आंबेकर यांना जाब विचारत त्यांना मारहाण केली, त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता, असे आंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या या तक्रारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेकर यांनी काही दिवसाआधी फेसबुकवर पवार यांच्या विरोधात पोस्ट केली होती. "माझी पण कवीता असे म्हणत आंबेकर यांनी लिहिले होते की ''भांडणे लावुन थकलो तरी समाधान नाही, मी प्रदीर्घ पदावरी होतो काही करु शकलो नाही. मी फक्त नारद कळीचा कोणी बाप म्हणत नाही. मी बाप म्हणतो स्वतःला कारण मनी समाधान नाही. माझा पुतण्या अन् नातु माझेच ऐकत नाही. तो देव साल्यानो तुमचा मला नेत पण नाही,'' अशी जहरी टीका आंबेकर यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.