Pune CBI Raid : पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त रामोड यांच्या कार्यालयावर 'सीबीआय'चा छापा

Pune Bribe News : नाशिकनंतर पुण्यातील उच्च अधिकारी लाचखोरीप्रकरणी अडचणीत
Anil Ramod
Anil RamodSarkarnama
Published on
Updated on

CBI Raid for Bribe : राज्यात सध्या नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्याचे लाचखोरी प्रकरण चांगलेच गाजत आहे. त्यातच पुण्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्ताला लाचखोरीप्रकरणी 'सीबीआय'ने रंगेहात पकडले आहे.

अधिक माहितीनुसार, पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांना शुक्रवारी (ता. ९) लाच घेतना 'सीबीआय'ने अटक केली आहे. 'सीबीआय'च्या या धाडीमुळे एकच खळबळ उडाली आहे. आता अटक केलेल्या अधिकाऱ्याची संपूर्ण चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातून त्यांनी किती मालमत्ता जमा केली, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Anil Ramod
Jayant Patil On Death Threat : शरद पवारांना आलेल्या धमकीवर जयंत पाटील म्हणाले, 'हे चाळे कोण करतंय ते सगळ्यांना..'

नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. चौकशीत त्यांच्याकडे मोठे घबाड आढळून आले होते. धनगर यांच्यावरील कारवाईने शिक्षणविभागत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची चर्चा राज्यात झाली.

Anil Ramod
Saurabh Pimpalkar with BJP Leaders: पवारांना धमकी देणाऱ्या पिंपळकर'चे भाजप नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल...

आज पुण्यातील महसूल विभागात मोठी कारवाई करण्यात आली. यात 'सीबीआय'च्या पथकाने महसूल विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. महामार्गालगच्या जमीनीबाबत होत असलेल्या व्यवहारात लाच घेतना ही कारावाई केल्याची माहिती आहे. पुण्यातील या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

(Edited Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com