Rupali Chakankar News: रुपाली चाकणकर कुणाच्या बाजूने? अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Rupali Chakankar: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Rupali Chakankar:
Rupali Chakankar: Sarkarnama
Published on
Updated on

NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. तर त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह एकूण नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडल्यामुळे राजकारण तापलं आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे देखील आपली भूमिका स्पष्ट करताना दिसून येत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Rupali Chakankar:
Ajit Pawar Big Step : विदर्भातील राष्ट्रवादीला ग्रहण लावणारे ठरले अजित पवारांचे बंड !

रुपाली चाकणकर यांनी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. रुपाली चाकणकर या शरद पवार यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. मात्र, रुपाली चाकणकरांनी आज अजित पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Rupali Chakankar:
Amol Kolhe Tweet : अमोल कोल्हेंची काल अजितदादांच्या शपथविधीला हजेरी; अन् आज म्हणतात मी शरद पवारांसोबत...

या भेटी दरम्यान रुपाली चाकणकरांनी अजित पवार यांच्याशी 15 ते 20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, रुपाली चाकणकरांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर या आधी ज्यावेळी अजित पवार यांनी बंड केले होते, तेव्हा चाकणकर या शरद पवार यांच्यासोबत होत्या. त्यावेळी पवार यांच्या सोलापूरमध्ये झालेल्या सभेत देखील चाकणकर उपस्थितीत होत्या. मात्र, आता अजित पवार यांच्या बंडानंतर रुपाली चाकणकरांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com