थेरगाव क्वीनचे थेट पोलिसांनाच आव्हान; मोठी हस्ती आपण, थोडेच टिनपाट आहोत!

थेरगाव क्वीनला पोलिसांनी ३० जानेवारीला अटक केली होती.
Thergaon Queen Marathi News Updates
Thergaon Queen Marathi News Updatessarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) मधील 'थेरगाव क्वीन' नावाने इंस्टाग्रामवर अकाऊंट चालवणाऱ्या मुलीने अश्लील शिवीगाळ करत व्हिडीओ पोस्ट केल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिला अटक केली होती. मात्र, पोलिसांच्या ताब्यातून सुटतात त्या मुलीने पुन्हा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत थेट पिंपरी-चिंचवड पोलिसांनाच आव्हान दिले आहे. (Thergaon Queen News Updates)

सोशल मिडियाच्या (Social Media) वेडातून अधिक लाईक्स आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी सध्याची तरुण पिढी काय करेल, याचा नेम नाही. इन्स्टाग्रामवर थेरगाव क्वीन असलेल्या एका १८ वर्षीय कॉलेज तरुणीने तिचा मित्र व मैत्रिणीच्या मदतीने अश्लील व धमकीचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले होते. त्यातून इतर तरुण, तरुणींची मानसिक स्थिती बिघडण्याची व त्यांची नीती भ्रष्ट होण्याची भीती ध्यानात घेऊन वाकड पोलिसांनी या साक्षी हेमंत श्रीमल वर गुन्हा नोंदवून तीला अटक केली होती.

Thergaon Queen Marathi News Updates
लाईक्स, फॉर्लाअर्सची नशा लय भारी; थेरगाव क्वीनला जेलची वारी!

या मुलीने पोलिस घेउन जात असतानाचा व्हिडीओ पोस्ट करत त्याला बॅकग्राउण्डला गाणे टाकले आहे. त्यामध्ये म्हटले आहे ''मोठी हस्ती आहे आपण, टिनपाट थोडीच आहे. ढगात आहे ना आपण, खालून किती पण दगड मारु द्या आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कुणाचे दगड'…अख्ख्या ब्रह्मांडाला शनि बोलून एकटा मी बास होतो, आमच्याबरोबर चालण्याचाबी त्रास होतो, नींद हराम करतो…''

दरम्यान, कायद्याच्या अज्ञानातून केलेल्या या कृत्याचा पोलिसांनी (Police) पकडल्यानंतर या थेरगाव क्वीनला पश्चाताप झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. तर पोलिसांची तिने माफी मागितली होती. पोलिसांच्या कारवाईतून तिला चांगला धडा मिळेल असे सांगितले जात होते. साक्षी हेमंत श्रीमल (वय १८, रा. पवारनगर, थेरगाव) असे या इन्स्टावरील थेरगाव क्वीनचे नाव आहे. ती बारावीत शिकत आहे. तिला आईवडिल नाहीत. त्यामुळे ती आज्जीकडे असते. तिची मानसिक स्थिती काहीशी ठीक नसल्यातून तिने अज्ञानातून हे धाडसवजा कृत्य केले, असे वाकड पोलिसांनी सांगितले होते. मात्र, पोलिस स्टेशनमधून सुटका होताच तीने पुन्हा तसेच व्हिडीओ तयार केले आहे. वाकड पोलिसांनी त्या मुलीला 30 जानेवारीला अटक केलेला होती. सुटका झाल्यानंतर तिने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत खुल पोलिसांना आव्हान दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Thergaon Queen Marathi News Updates
चिंचवडेंवर तातडीने गुन्हा पण कृष्णप्रकाशांची भाजप आमदाराच्या भाच्यावर मेहेरबानी!

सध्या सायबर (Cyber ​​Crime) गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सोशल मिडियावर वॉच ठेवण्यासाठी सोशल मिडिया सेल स्थापन केला आहे. त्यांना इन्टाग्रामवर काही अश्लील, धमकीचे आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता गृहित धरून वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी आपल्या डीबीच्या (गुन्हे शोध) पथकाला तातडीने कारवाईचा आदेश दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com