Pune News : चंद्रकांतदादा आले अन् अजितदादांचे व्यंगचित्र शोधू लागले; दादांची भन्नाट मिश्किली..

Chandrakant Patil On Ajit Pawar : "मी तुम्हाला फक्त बसवलंच नाही तर झोपवलं देखील.." दादांची भन्नाट मिश्किली..
Pune News : Ajit Pawar : Chandrakant Patil On Ajit Pawar :
Pune News : Ajit Pawar : Chandrakant Patil On Ajit Pawar : Sarkarnama

Pune News : पुणे शहरात आज बालगंधर्व रंगमंदिरच्या दालनात व्यंगचित्राचं प्रदर्शन भरवण्यातआले आहे. पुण्यात सुरू असणाऱ्या या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनाला पुण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी व्यंगचित्रे पाहून त्यांनी राज्यातील विविध राजकीय नेत्यांवर शेरेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर पाटलांनी आपल्या मिश्किल स्वभावात टिपण्णी केली.

Pune News : Ajit Pawar : Chandrakant Patil On Ajit Pawar :
Sushma Andhare News : "मला नरडं तर त्यांना गळा, अमृता वहिनींची मराठी ऐकून कानात शिसं ओतल्यासारखं.."; अंधारेंनी डिवचलं !

बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात व्यंगचित्रे पाहायला येताच चंद्रकांत पाटील यांना विरोधीपक्ष नेते अजित पवारांची (Ajit Pawar) आठवण आली. आत येताच पाटीव म्हणाले, "अजित पवार यांचं व्यंग चित्र लावलं आहे का?"

Pune News : Ajit Pawar : Chandrakant Patil On Ajit Pawar :
Adv. Ujjwal Nikam : अजमल कसाब मला 'बादशहा' म्हणायचा

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राजकीय नेत्यांवर मिश्किल टीपण्णी केली. एक व्यंगचित्र राजकीय नेत्यांना त्यांचं समाजातलं आपलं स्थान दाखवून देतो. इथे तर या प्रदर्शनात तर अनेक व्यंगचित्रे आहेत. जी त्या नेत्यांना करेक्ट झोंबतील, असेही पाटील म्हणाले.

Pune News : Ajit Pawar : Chandrakant Patil On Ajit Pawar :
Sharad Pawar On Nana patole : नाना पटोलेंचा दावा पवारांनी फेटाळला; म्हणाले, मुख्यमंत्री तर...

एक व्यंगचित्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, युवासेना नेते आदित्य ठाकरे आणि आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिसत आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवारांना विचारत आहेत की, माझं नेमकं काय चुकलं हे समजत नाही, असं म्हणत पाटलांनी हळूच चिमटा काढला.

Pune News : Ajit Pawar : Chandrakant Patil On Ajit Pawar :
Chhagan Bhujbal On Raj Thackeray : राज ठाकरे, फुले, शाहू, आंबेडकरांचे नांव का घेत नाही?

पाटील म्हणाले, एका व्यंगचित्रकात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका बेडवर झोपलेले दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना विचारणा करत आहेत की, 'पाहा मी तुम्हाला फक्त बसवलंच नाही तर झोपवलं देखील, असंही पाटील सूचकपणे म्हणाले.

व्यंगचित्र हा केवळ व्यवसाय नाही तर ती आवड आहे. खूप जास्त इंटरेस्ट घेऊन मी व्यंगचित्र पाहतो. व्यंगचित्र हे थोडक्यात समाजातील न्यूनता दर्शवते. कुणी कुणाला चिमटा काढला, हे पहायला मला आवडतं. राज्याच्या नव्या शिक्षण धोरणात अनेक नवनवे विद्याशाखा सुरू करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न आहे. यामध्ये व्यंगचित्रासाठीसुद्धा एखादा कोर्स सुरू करावा. यासाठी जी काही मदत लागेल ते शासनस्तरावर मिळवून देण्यासाठी मी मदत करेन, असंही पाटील म्हणाले. व्यंगचित्रकारांना शासनस्ररावरून काही मानधन मिळावं, यासाठीहू प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, पाटलांनी यावेळी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com