Chitra Wagh : भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची तुलना वाघ यांनी थेट महात्मा जोतिबा फुले (Mahatma Phule ) यांच्याबरोबरीने केली. वाघ म्हणाल्या, "घरोघरी आपल्याला सावित्री दिसून येतात, मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध सुरु आहे, असं विधान वाघ यांनी केले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.
पुण्यात भाजपच्या वतीने मकर सक्रांतीच्या निमित्ताने 'सन्मान स्त्री शक्ती' असा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. याच कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ हे उपस्थित होते. तसेच पुणे भाजप महिला नेत्या व पदाधिकारी देखील यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहिल्या होत्या. या कार्यक्रमात वाघ यांनी उपस्थित महिलाना संबोधित केलं. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटीलांची तुलनाच थेट महात्मा फुले यांच्याशी करत, नव्या वादाला तोंड फोडले आहे.
' महिलांच्या जेवढ्या काही म्हणून चळवळी घडून आल्या, त्या सर्व महिला चळवळींचं केंद्र हे नेहमीच पुणे राहिलेलं आहे. आजदेखील याची सुरुवात पुण्यातूनच झाली आहे. त्या म्हणाल्या, मी नेहमी म्हणत असते, आम्हाला घरोघेरी सावित्रीमाई दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध सुरू आहे, असं अजब विधान वाघ यांनी यावेळी केलं.
मागील काही दिवसांपासून एकीकडे महापुरूषांचा अवमाना या मुद्द्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलेलं असताना, चित्रा वाघ यांचं हे ताजं वादग्रस्त विधानाने, पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.