Amol Kolhe will join BJP: चंद्रकांत पाटील म्हणाले, अमोल कोल्हे भाजपात येणार असतील तर...

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या
Amol Kolhe will join BJP:
Amol Kolhe will join BJP:
Published on
Updated on

Amol Kolhe will join BJP: काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रसेचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.त्यावर कोल्हे यांनी स्वतः स्पष्टीकरणही दिले. पण आता मात्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

‘सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ४९ आमदार आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना तेवढ्यावरच थांबवायचे असा आमचा कोणताही विचार नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही तसं म्हणायच नव्हतं. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात लोकसभा निवडणूका सुरु होणार असतील तर शिरुर किंवा हातकणंगले सारख्या मतदार संघात काय करायचं याचा प्रश्न आहे.शिरुरमध्ये गेल्यावेळी शिवाजीराव आढाळराव पाटील लढले होते. २०१९ मध्ये तिथे अमोल कोल्हे विजयी झाले.

पण निवडणुकीच्या आधी अमोल कोल्हेंना भाजपात यावंस वाटलं, तर विद्यमान खासदार म्हणून त्यांना तिकीट द्यावं लागेल. पण मग ते कुणाकडून लढणार, शिंदे गटाकडून की भाजपकडून, असा प्रश्न उरतोच, त्याबाबत त्यांना विचारलं जाईल, अशी प्रतिक्रीया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरुन तर्कवितर्क काढले जात आहेत. ‘आढळराव पाटील सारखा तीन वेळचा खासदार असतानाही अमोल कोल्हे भाजपत यायचं असेल तर आढळरावांना समजावलं जाईल. पण त्यानंतरही कुणाच्या बाजूने लढायचं हा निर्णय अमोल कोल्हेंचा असणार आहे. असे पाटील म्हणाले.

दरम्यान, आता चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून खासदार कोल्हे भाजपात जाणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कोल्हेंनी आधीही या विषयावर स्पष्टीकरण दिले होतं. पण पाटील यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. आता यावर खासदार कोल्हे काय उत्तर देतात. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com